आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा धुव्वा; भारत सेमीफायनलमध्ये दाखल; भारत-मलेशिया आज झुंज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुअांटन- जबदरस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी अाशियाई चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेत चीनचा धुव्वा उडवला. भारताने ९-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह भारताने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अफ्फान युसूफ (१९, ४० वा मि.), अाकाशदीप (९, ३९ वा मि.) अाणि जसजित सिंग (२२, ५१ वा मि.) यांनी प्रत्येकी दाेन गाेल करून भारताला शानदार विजय मिळवून दिला. भारताच्या विजयात रूपिंदर पाल (२५ वा मि.), निकिन थिमैया (३४ वा मि.) अाणि ललित उपाध्याय (३७ वा मि.) यांनी संघाच्या विजयात प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. सामन्यात भारताने पहिल्या हाफमध्ये चार अाणि दुसऱ्या हाफमध्ये पाच गाेल केले. भारताचा स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला. यासह भारताला १० गुणांच्या बळावर गुणतालिकेत अव्वलस्थानावर धडक मारता अाली. तसेच भारताने माेठ्या फरकाने स्पर्धेत दुसरा सामना जिंकला. यापूर्वी सलामीला जपानचा १०-२ ने पराभव केला हाेता.

पाककडून जपानचा पराभव
गत विजेत्या पाकिस्तानने स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. पाकने सामन्यात जपानवर ४-३ ने मात केली. पाकने गुणतालिकेत गुणांसह तिसरे स्थान गाठले. या विजयाच्या बळावर पाकला अापल्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या अाशा कायम ठेवता अाल्या.
बातम्या आणखी आहेत...