आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Chess Competition, Lin Chen Vs Abhijit Gupta Won

लिन चेनविरुद्ध अभिजित गुप्ताचा सनसनाटी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल एेन- ग्रँडमास्टर अाणि राष्ट्रकुलचा चॅम्पियन अभिजित गुप्ताने एशियन काँटिनेन्टल बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सनसनाटी विजयाची नाेंद केली. त्याने सातव्या फेरीत चीनच्या लीन चेनचा पराभव केला. यासह त्याने संयुक्तपणे अव्वल स्थानावर धडक मारली. सूर्यशेखर गांगुली ५.५ गुणांसह अभिजितसाेबत अव्वल स्थानावर कायम अाहे. गांगुलीने रंगतदार लढतीत व्हिएतनामच्या ले क्वांग लिएमला बराेबरीत राेखले.
दुसरीकडे शशिकिरण, सेनगुप्ता यांनीही विजय संपादन केला. शशिकिरणने सातव्या फेरीत दारिनी पाैरियाचा पराभव केला. तसेच दीप सेनगुप्ताने ताबातबाई अमीनविरुद्ध विजय मिळवला. विजयालक्ष्मीने हेजाझिपाेयुरवर मात केली.