आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देबोराहने सुनामीत पाच दिवस झाडावर राहून वाचवले प्राण; आता आशियाई सायकलिंग स्पर्धेत सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील एका खेळाडूत ऑलिम्पिकसाठी इतकी तीव्र इच्छाशक्ती आहे की ती गेल्या चार वर्षांपासून आपल्या घरी सुद्धा गेली नाही. पुढची दोन वर्षे आणखी तिला घरी जायची इच्छा नाही. तिला ऑलिम्पिकची पात्रता मिळवायची आहे. भारताची अव्वल महिला सायकलपटू देबोराह हेराल्ड ही खेळाडू आहे. वयाच्या १७ व्या वर्षी ती अंदमान- निकोबार सोडून दिल्लीत आली. आता १८ फेब्रुवारी रोजी ती वयाची २२ वर्षे पूर्ण करेल. या चार वर्षांत तिने आपल्या आई-वडिलांना एकदासुद्धा पाहिले नाही. केवळ फोनवर बोलणे होते. देबोराह इंदिरा गांधी वेलोड्रमवर सुरू झालेल्या ३७ व्या आशियाई ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताच्या ३५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करत आहे.   

आठ वर्षांपूर्वी देबोराह अंदमान आणि निकोबार बेटावर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत ती बालंबाल बचावली होती. पाच दिवस झाडावर राहून झाडाची पाने खाऊन तिने प्राण वाचवले होते. ती म्हणजे, “मी इतक्या कठीण प्रसंगातून बाहेर आले आहे. आता ऑलिम्पिकसाठी तर मी नक्की क्वालिफाय करीन, असे मला वाटते. हेच माझे स्वप्न आहे. मी पदक जिंकले तर मग हे सोन्याहून पिवळे ठरेल. मात्र, त्यासाठी मला ऑलिम्पिक क्वालिफाय करावे लागेल. आतापर्यंत अंदमान-िनकोबारच्या एकाही खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेला नाही. मी ही कामगिरी करायची आहे. मला देशाचे नाव बुलंद करायचे आहे.’  

देबोराह २०१२ मध्ये चर्चेत आली.  त्या वेळी तिने नॅशनल्समध्ये सुवर्ण जिंकले होते. यानंतर २०१३ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये देबोराहने ज्युनियर गटात रौप्यपदक पटकावले. देबोराहने २०१४ च्या ट्रॅक सायकलिंग आशिया चषकात तीन गटांत चार सुवर्णपदके जिंकली होती. यानंतर २०१५ मध्ये देबोराहने तीन सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. यावर्षी तैवान कप ट्रॅक इंटरनॅशनल क्लासिक इव्हेंटमध्ये तिने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके पटकावली. डिसेंबर २०१५ मध्ये वैयक्तिक टाइम ट्रायल रँकिंगमध्ये जगात चौथ्या क्रमांकाची खेळाडू बनली. हे तिचे सर्वोत्तम रँकिंग आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...