आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झा- राेहन बाेपन्नाने मिळवून दिला अॅसेसला दुसरा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेकियाे - जगातील नंबर वन सानिया मिर्झाने अापला सहकारी राेहन बाेपन्नासाेबत अांतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगमध्ये (अायपीटीएल) धडाकेबाज दुसऱ्या विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर इंडियन अॅसेस संघाने स्पर्धेतील दुसरा सामना जिंकला. अाता अॅसेसने सामन्यात सिंगापूर स्लॅमर्सवर मात केली. अॅसेसने २६-२५ अशा फरकाने सामना जिंकला. सुमार खेळीमुळे सिंगापूरच्या टीमला स्पर्धेत दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

दुसरीकडे जपान वाॅरियर्सने सामन्यात यूएई राॅयल्सवर २३-२० ने मात केली. यासह जपानच्या टीमने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले.

निर्णायक सामन्यात कर्स्टन फ्लिपकेंन्सने विजय संपादन करून अॅसेसच्या नावे सामना केला. तिने महिला एकेरीच्या लढतीत सिंगापूरच्या किकी बर्टेन्सवर मात केली. तिने ६-५ ने विजय मिळवला. यासह तिने अॅसेसला ३४ मिनिटांत विजय मिळवून दिला.

येलेनाची मार्टिनावर मात : जपान वाॅरियर्सच्या येलेना वावरिंकाने अवघ्या २१ मिनिटात मार्टिना हिंगीसवर मात केली. तिने ६-१ असा एकतर्फी विजय मिळवला. यासह तिने जपानला अाघाडी मिळवून दिली.
सानिया मिर्झा- रोहन बाेपन्ना २५ मिनिटांत ६-४ ने विजयी
इंडियन अॅसेस संघाकडून सानिया मिर्झा अाणि राेहन बाेपन्नाने मिश्र दुहेरीत विजय संपादन केला. या जाेडीने सिंगापूरच्या मार्सेलाे मेलाे अाणि किकी बर्टेन्सवर मात केली. त्यांनी ६-४ ने सामना जिंकला. त्यांनी २५ मिनिटांत विजयाची नाेंद केली.
बातम्या आणखी आहेत...