आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टवर वाईट वर्तणूक; विरोधी खेळाडूच्या गर्लफ्रेंडवर टीका, तर कधी कोर्टवर पंचांना शिवीगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सुमार वर्तणुकीमुळे नेहमी चर्चेत राहणारा ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू नीक किर्गियोसवर एटीपीने आठ महिन्यांची बंदी घातली आहे. किर्गियोसने नुकत्याच झालेल्या शांघाय मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजयासाठी प्रयत्नच केले नव्हते.
एटीपीने जवळपास २६ वर्षांनी शिस्तभंगाची कारवाई करताना एखाद्या खेळाडूला निलंबित केले आहे. यापूर्वी १९९० मध्ये अमेरिकेचा स्टार जॉन मॅकेन्रोला निलंबित करण्यात आले होते. किर्गियोसवर २५ हजार डॉलरचा दंडही लावण्यात आला आहे. २१ वर्षीय किर्गियोसने मिस्चा ज्वेरेवविरुद्ध सामन्यात बरेचदा शक्य असताना रिटर्न केले नाही. जगात १४ व्या क्रमांकावर असलेला किर्गियोस आधीसुद्धा विरोधी खेळाडू, पंचांसोबत वाद घातल्याने चर्चेत राहिला आहे. एटीपीने म्हटले, ‘किर्गियोस गुणवंत खेळाडू आहे. मात्र, त्याची वर्तणूक बिघडत आहे. त्याने एखाद्या उत्तम स्पोर्ट््स मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार घ्यावा. असे केले तर त्याची तीन आठवड्यांची बंदीची शिक्षा कमी करण्यात येईल.’ किर्गियोसने २०१३ मध्ये ज्यु. अॉस्ट्रेलियन ओपनचा एकेरीचा किताब जिंकला होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, किर्गियोसशी संबंधित इतर काही वाद..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...