आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीपी टूर फायनल्स: नदाल सेमीफायनलमध्ये; वावरिंकाची फेररवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातला नंबर पाचचा खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने सुमार सत्रानंतर पुन्हा आपला फॉर्म परत मिळवला आहे. नदालने इंग्लंडच्या अँडी मरेवर मात करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये नदालने हा सामना सरळ सेटमध्ये ६-४, ६-१ ने जिंकला. इतर एका सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने सरळ सेटमध्ये विजय मिळवत डेव्हिड फेररला स्पर्धेबाहेर केले.
२९ वर्षीय नदालने कोर्टच्या जवळपास प्रत्येक जागेहून जबरदस्त बॅकहँडचे फटके मारताना विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना अँडी मरेला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. नदालने या विजयासह अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. अंतिम चारमध्ये नदालचा सामना आता फ्रेंच ओपन चॅम्पियन वावरिंकाशी होईल. नदाल आणि मरे यांना यापूर्वी कधीही वर्ल्ड टूर फायनल्सचा किताब जिंकता आलेला नाही. नदाल २०१० आणि २०१३ मध्ये उपविजेता होता, तर मरे २००८, २०१०, २०१२ घरच्या मैदानावरील या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत पोहोचला. या सामन्यापूर्वी नदालचा ब्रिटिश खेळाडू मरेविरुद्ध एकूण विजय-पराभवाचा हिशेब १५-६ असा होता. आता हा रेकॉर्ड १६-६ असा झाला आहे. एटीपी स्पर्धेतील मागच्या चार सामन्यांत मरे नदालला हरवू शकला नाही.
वावरिंकाची फेररवर मात
इतर एका लढतीत जगातला चौथ्या क्रमांकाचा खेळाडू वावरिंकाने सातवा मानांकित स्पेनचा खेळाडू डेव्हिड फेररला ७-५, ६-२ ने पराभूत करीत सेमीफायनल प्रवेशाच्या आशा मजबूत केल्या. या सामन्यात नदालच्याच देशाचा फेरर वावरिंकाला पराभूत करू शकला असता. पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतर तो ही लय कायम ठेवू शकला नाही.अव्व्ल आठ खेळाडूंच्या या स्पर्धेत २००७ चा फायनलिस्ट ३३ वर्षीय फेररने लंडनच्या ओटू एरिनामध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये फेरर ५-२ ने पुढे होता. तो हा सेट जिंकेल, असे वाटत होते. मात्र, फेररने आपल्या चुकांनी हा सेट आणि नंतर सामनाही गमावला. नदालकडून पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या वावरिंकाने झालेल्या चुकांतून धडा घेत या लढतीत चांगले प्रदर्शन केले. वावरिंकाने जबरदस्त पुनरागमन करताना बाजी मारली.
वावरिंकाने पहिल्या सेटमध्ये घेतलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम ठेवला. त्याच्या या आक्रमक खेळामुळेच तो सामन्यात पुनरागमन करू शकला आणि त्याने ७-५, ६-२ ने सामना जिंकला.

राेहन बाेपन्ना-मर्जिया दुसऱ्या स्थानावर
दुहेरीच्या जगातील नंबर वन ब्रायन बंधूंना पराभूत करणाऱ्या भारताचा राेहन बाेपन्ना अाणि राेमानियाच्या फ्लाेरिन मर्जियाने अॅशेस/ स्मिथ ग्रुपमध्ये दुसरे स्थान गाठले. या अाठव्या मानांकित जाेडीला गुरुवारी पराभवाला सामाेेरे जावे लागले. इटलीच्या फेबियाे फाेगनिनी अाणि सिमाेने बाेल्लेलीने अाठव्या मानांकित जाेडीचा पराभव केला. त्यांनी ६-४, १-६, १०-५ अशा फरकाने सामना जिंकला. इटलीची ही जाेडी विजयासह गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर अाहे. भारताच्या राेहन बाेपन्नाने स्पर्धेतील अापल्या सलामी सामन्यात राेमानियाच्या मर्जियासाेबत अमेरिकेच्या बाॅब -माइक ब्रायनला पराभूत केले हाेते. या सनसनाटी विजयानंतर अाठवी मानांकित जाेडी चर्चेत अाली.

महत्त्वपूर्ण विजय
^हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण, यामुळे अंतिम चारमध्ये माझे स्थान मजबूत झाले आहे. याशिवाय कोर्टवर एका मोठ्या खेळाडूविरुद्ध हा विजय ठरला. या विजयाने दिवसही चांगला ठरला.
- राफेल नदाल, विजयानंतर.

निशिचा बर्डिचला धक्का
जपानच्या केई निशिकाेरीने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात टाॅमस बर्डिचचा पराभव केला. त्याने रंगतदार लढतीमध्ये ७-५, ३-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला.