आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Loss In State Level Football Competition

औरंगाबादचा पराभव; नाशिक, लातूर, मुंबईची विजयी सलामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व फुटबॉल संघटनेतर्फे जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या महिलांच्या शालेय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षे गटात मुंबई, नाशिक आणि १४ वर्षे गटात पुणे, लातूर, कोल्हापूरच्या संघांनी विजयी सलामी दिली.

विभागीय क्रीडा संकुल व पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या लढतीत यजमान औरंगाबादच्या १७ वर्षे व १४ वर्ष संघाला पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते व आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा उपसंचालक राजकुमार महादवाड, जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे अनिल इरावणे, सुनील पालवे, डॉ. आशा साकोळकर, सय्यद लियाकत हुसेन, अब्दुल कदीर, उपस्थित होते.

इतर निकाल
१९ वर्षे - पुणे विभाग वि. वि. कोल्हापूर विभाग (५-०), नागपूर विभाग वि. वि. लातूर (७-०), मुंबई विभाग वि. वि. अमरावती (१-०). १४ वर्षे - पुणे विभाग वि. वि. अमरावती विभाग (६-०), कोल्हापूर विभाग वि. वि. औरंगाबाद (५-२), लातूर विभाग वि. वि. नागपूर विभाग (३-२).