आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्यपद स्पर्धा : जानकी पाटील तिहेरी मुकुटाची मानकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित स्व. प्राचार्य के. डी. गादिया स्मृती बॅडमिंटन अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जानकी पाटीलने तीन गटांत विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट मिळवला. मुलांमध्ये अर्णव रश्मी शिरीष, सिद्धेश देशमुख आणि रुद्र अभ्यंकरने दुहेरी यश संपादन केले. स्पर्धेत एकूण ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

जानकीने १५ वर्षांखालील गटात रुची कासलीवालवर २१-१३, २३-२१ ने मात केली. त्याचप्रमाणे १७ आणि १९ वर्षांखालील गटात अनुक्रमे नेहा सिकची (२१-११, १८-२१, २१-१२) आणि पीयूषा गुमटेला (२१-१५, २१-१७) हरवत प्रथम क्रमांक मिळवला. मुलांमध्ये १९ वर्षे वयोगटात अंतिम फेरीत अर्णव रश्मी शिरीषने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत दर्शन भालेरावचा २१-१६, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. अर्णवने अक्षय बिवरेचा २१-१२, २१-१६ ने पराभव करत पुरुष एकेरीत गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेप्रसंगी शहरातील माजी बॅडमिंटन प्रशिक्षक विलास कोल्हटकर यांचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी नितीन इंगोले, ऋतुपर्ण कुलकर्णी, प्रभाकर रापतवार आणि अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

इतर निकाल
१० वर्षे मुले : देवांश बडवे वि. वि. अगम मेहता २१-१०, २१-१६, मुली - मानसी कुळकर्णी वि. वि. मिहिका घुटी २१-०२, २१-०६.
१३ वर्षे मुले - सिद्धार्थ मुथियान वि. वि. प्रांशू गुमटे २०-२२, २१-१४, २१-११, मुली - सोनाली मिरखेलकर वि. वि. मिताली कुळकर्णी.

अंतिम निकाल
१५ वर्ष मुले : रुद्र अभ्यंकर वि. वि. पृथ्वी बायस २१-१२, २१-०८.
१७ वर्ष मुले : सिद्धेश देशमुख पाटील वि. वि. दर्शन भालेराव २१-१४, २१-१३.
पुरुष दुहेरी : चेतन तायडे व हिमांशू गोडबोले वि. वि. अमित सानप व सिद्धार्थ पाटील २१-१६, २२-२०.
१३ वर्ष मुले दुहेरी : सिद्धार्थ मुठीयान व तन्मय खडके वि. वि. अरिहंत पांडे व निषाद २१-११, २१-०७.
१५ वर्ष मुले दुहेरी : रुद्र अभ्यंकर व गौरव मंत्री वि. वि. आदित्य नेमिवंत व मानस पाटील २१-१३, २१-१४.
१७ वर्ष दुहेरी : सर्वेश कुबेरकर व सिद्धेश देशमुख वि. वि. उत्कर्ष देसरडा.
बातम्या आणखी आहेत...