आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरियाविरुद्ध भारताचा पराभव: अाशिया टीम बॅडमिंटन; भारतावर ४-१ ने मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माे चि मिन्ह - दमदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी अाशिया मिक्स टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. काेरियाविरुद्ध सामन्यात भारताचा पराभव झाला. काेरियाने ४-१ अशा फरकाने भारतावर मात केली. भारताला ड गटात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी भारताने सिंगापूरवर ४-१ ने मात करून अंतिम अाठमध्ये धडक मारली हाेती. मात्र, त्यानंतर भारतालाही अापली लय कायम ठेवता अाली नाही.  

अश्विनी पाेनप्पा अाणि बी. सुमीत रेड्डीचा मिश्र दुहेरीत पराभव झाला. काेरियाच्या यु जुंग चाई अाणि चाेऊने सामन्यात भारताच्या जाेडीवर २१-१७, १७-२१, २१-१७ ने मात केली. यासह काेरियाने १-० ने अाघाडी मिळवली. त्यानंतर स्वस्तिकराज अाणि चिराग शेट्टीचा पुुरुष दुहेरीत पराभव झाला. काेरियाच्या जुंग किम अाणि येवाेन सेअाेगने भारताच्या जाेडीला २१-२४, २८-२६ ने धूळ चारली. यासह काेरियाने  अाघाडी कायम ठेवली.  दरम्यान, महिला एकेरीच्या लढतीत तन्वी लाड अापली छाप पाडू शकली नाही. तिला जी ह्युन संुगने २१-८, २१-१५ ने पराभूत केले.   
 
प्रणयचा एकमेव विजय 
भारतीय संघाकडून एच. एस. प्रणयने काेरियाविरुद्ध शानदार एकमेव विजय संपादन केला. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीमध्ये काेरियाच्या वान हाे साेनचा पराभव केला. त्याने २४-२२, २१-९ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. 
बातम्या आणखी आहेत...