सिडनी- यजमान अाॅस्ट्रेलिया महिला टीमने नेटबाॅल विश्वचषकात मंगळवारी इंग्लंडला १० गाेलने पराभूत केले. अाॅस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करून सामन्यात अापला दबदबा निर्माण केला. त्यानंतर या टीमने शेवटपर्यंत ही अाघाडी कायम ठेवली. त्यामुळे यजमान टीमला पहिल्या क्वार्टरमध्ये १२-९ ने अाघाडी मिळाली हाेती. दुसरीकडे न्यूझीलंडने जमैकावर ५५-४८ ने मात केली. फिजीने श्रीलंकेला ७७-३१ ने पराभूत केले. तसेच स्काॅटलंडने बार्बाडाेसचा ३७-३४ ने पराभव केला.