आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगी लेन हिने मुलासमोर फिट दिसण्यासाठी बॉडी बिल्डिंग सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ- तिला आपल्या मुलासमोर फिट दिसायचे होते. मुलासमोर रोल मॉडेल बनण्यासाठी तिने बॉडी बिल्डिंग सुरू केली. आता ती बॉडी बिल्डिंगमध्ये सहा वेळेसची चॅम्पियन आहे. सोबत ती आता आपल्या जवळपासच्या इतर महिलांनाही फिटनेसचा मंत्र देते. बॉडी बिल्डिंगचे ट्रेनिंग देत असलेल्या पर्थच्या २५ वर्षी मॅगी लेनची ही कथा आहे. तिला तीन वर्षांचा मुलगा नोहसुद्धा आहे.
चार वर्षांपूर्वी मॉडेल किंवा सेलिब्रिटीप्रमाणे मॅगीला सडपातळ होण्याची इच्छा निर्माण झाली. यामुळे तिने दिवसात फक्त एक वेळा जेवणास सुुरुवात केली. ती चार वेळा केन डायट केक पीत होती. ती फक्त ५०० कॅलरीचा आहार घेऊ लागली. यामुळे तिचे शरीर सडपातळ झाले. तिचे वजन ५० किलोपेक्षाही कमी झाले. आपल्या लूकमुळे ती नाराज होती. यादरम्यान २०१२ मध्ये ती गर्भवती झाली. तिने आपले रुटीन कायम ठेवले. ती जितकी खायची त्यापेक्षा अधिक वर्कआऊट करायची. आपल्या बाळासाठी स्वत:ला फिट ठेवणे आवश्यक आहे असे मॅगीला वाटले. तिच्या मित्रांनी तिला बॉडी बिल्डिंग करण्याचा सल्ला दिला. तिने बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. तिने आपल्या डायटमध्येही बदल केला. यामुळे वजन वाढू लागले. शरीर नीट शेपमध्ये येऊ लागले. बाळाच्या जन्मानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला घेऊन अधिक वजन उचलण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये तिने पहिल्यांदा बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. ती सहा वेळा चॅम्पियन राहिली आहे. आता ती ३००० कॅलरीचा आहार घेते. तिचे वजन ६५ किलो झाले आहे. मॅगी म्हणते, "आधी मी फक्त सकाळचे जेवण घेत होते. बाॅडी बिल्डिंग सुरू केल्यानंतर मी दिवसांतून पाच वेळा आरोग्यदायी आहार घेत आहे. मला माझा मुलगा नोहसमोर रोल मॉडेल बनायचे होते. यामुळे मी स्वत:मध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. आता मी खूप खुश आहे. मी रोज तीन तास जिममध्ये व्यायाम करते. लोक तुमच्याबाबत काय म्हणतील यापेक्षा आपण स्वत: आपल्याबाबत काय विचार करतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे. नोह माझी ट्रॉफी बघून म्हणतो की, मी ज्या वेळी मोठा होईल त्या वेळी तुझ्यासारखा बॉडी बिल्डर बनेल. हे माझ्या जीवनातील मोठे यश आहे.'
आता मी जुने फोटो बघते तेव्हा मी किती अस्वस्थ होते हे माझ्या लक्षात येते. मी खूप थकलेले दिसायचे. दुबळे होते. सडपातळ होण्याचा माझा निर्णय खूप चुकीचा होता. फिट दिसले पाहिजे, असेही मॅगी म्हणते. आता मी इतरांनाही समजून घेते. समाजातील लोक आपल्याबाबत काय म्हणतात यावर लक्ष देण्याऐवजी मी आरोग्यदायी राहण्यावर लक्ष देते. यामुळे मला आनंद मिळतो, असेही मॅगी म्हणते.