आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australian Captain Smith Trying To Cheat In Bengaluru Test Against India

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथची खुलेआम चीटिंग; भडकला विराट, हा होता मोमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रेसिंग रूमकडे पाहताना स्मिथ. DRS घेऊ की नको हे त्याला ड्रेसिंग रूममध्ये विचरायचे होते. - Divya Marathi
ड्रेसिंग रूमकडे पाहताना स्मिथ. DRS घेऊ की नको हे त्याला ड्रेसिंग रूममध्ये विचरायचे होते.
स्पोर्ट्स डेस्क- बंगळुरु कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीवन स्मिथने चीटिंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा स्मिथ lbw आऊट झाला होता. त्याला पंचाने बाद ठरविल्यानंतर त्याला या निर्णयाबाबत शंका होती. त्यामुळे  डीआरएस घ्यावा की नको याबाबत तो कन्फ्यूज होता. त्याच वेळी त्याने असे काही केले की, ज्यामुळे विराट कोहली नाराज झाला आणि पंचानीही स्मिथला थांबवले. यासाठी ड्रेसिंग रूमकडे पाहत होता स्मिथ...
 
- 21 व्या षटकात उमेश यादवच्या तिस-या चेंडूवर स्मिथला पंचानी पायचित बाद दिले. 
- स्मिथ स्पष्टपणे बाद झाल्याचे दिसत होते, तरीही तो नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेल्या सहकारी खेळाडू मिशेल मार्शला बातचित करू लागला.
- तेथूनच स्मिथने DRS चा निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रूमकडे इशारा केला. हे पाहताच चेतेश्वुर पुजारा स्मिथच्या समोर आला. तसेच पंचानीही स्मिथला तत्काळ थांबवले. 
 
भडकला तापट विराट-
 
- पंचानी फटकारताच स्मिथ तत्काळ मैदान सोडून जावू लागला. मात्र, तोपर्यंत तापट विराट चांगलाच तापला होता.
- स्मिथ पॅव्हेलियनमध्ये जात असताना तो खूप वेळ पंचाशी बोलत होता. 
- क्रिकेटचा नियम सांगतो की, DRS चा निर्णय घेण्यासाठी पॅव्हिलियनमध्ये बसलेल्या खेळाडूचा सल्ला घेणे बेकायदेशीर आहे.
- ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथ त्यावेळी नेमके तेच करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, ही बाब ना पंचाच्या नजरेतून सुटली ना भारतीय खेळाडूच्या. नंतर टीव्हीवरही वारंवार ते दृश्य दाखवले जात होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कसा घडला संपूर्ण मोमेंट...
बातम्या आणखी आहेत...