आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेत वाक‌्युद्ध रंगणारच : स्मिथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट लढतीची खुमारी फक्त मैदानावरील कौशल्यापुरतीच मर्यादित नसून उभय संघांतील वाकयुद्धानेही मालिकेची रंगत वाढते, या आजवरच्या अनुभवाला या वेळीही छेद दिला जाणार नसल्याची ग्वाही, चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघांच्या कर्णधार स्टिव्ह स्मिथने आज मुंबईत दिली. सर्वोत्तम कामगिरीसाठी वाकबाण  प्रेरक ठरत असतील तर आपण आपल्या खेळाडूंना आवरणार नाही हेही स्मिथने स्पष्ट केले आहे.  

स्मिथ पुढे म्हणाला, ‘मला वाटते प्रत्येक खेळाडूच्या खेळाची आणि मैदानावर वावरण्याची स्वत:ची शैली असते. त्यांना शाब्दिक चकमकीच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करण्याची ऊर्जा मिळत असेल तर मी त्यांना रोखणार नाही. सर्वोत्तम काय आहे ते प्रत्येक खेळाडूने स्वत: ठरवावे. फिरकीसाठी रणनिती तयार आहे,’ असे तो म्हणाला.  
बातम्या आणखी आहेत...