आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅथन लाॅयन ४ वर्षांपर्यंत हाेता ग्राउंडमन, बिग बॅशमध्ये खेळल्यानंतर राष्ट्रीय संघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्गज फिरकीपटू शेन वाॅर्नच्या निवृत्तीनंतर अाॅस्ट्रेलिया टीम एका सरस स्पिनरच्या शाेधात हाेती. यादरम्यान अनेक गाेलंदाज अाले, मात्र फिरकीसाठी त्या स्तरावरचा एकही खेळाडू गवसला नाही. त्यानंतर नॅथन लाॅयनची अाॅस्ट्रेलियन संघामध्ये एन्ट्री झाली. या युवा गाेलंदाजाने अव्वल खेळाडूच्या रूपात संघामध्ये अापले स्थान निश्चित केले. त्याने पदार्पणापासून  (२०११) अाजतागायत  तिन्ही फाॅरमॅटमध्ये  २५० विकेट घेतल्या अाहेत.
 
लाॅयनचा जन्म २० नाेव्हेंबर १९८७ मध्ये अाॅस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये झाला. घराच्या पाठीमागील बॅकयार्डमध्ये ताे अापला माेठा भाऊ ब्रॅडनसाेबत क्रिकेट खेळत हाेता. राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळेल हे दाेघांनीही कधी स्वप्नात पाहिले नव्हते. याशिवाय अापण अाॅस्ट्रेलियातील अाघाडीचा गोलदांज म्हणून अाेळख  निर्माण करू,  असेही त्यांना वाटले नाही. मात्र, क्रिकेटमधील अावड लक्षात घेऊन वडील स्टीव्हन लाॅयन अाणि अाई ब्राेविन लाॅयनने मुलांना कॅनबेरामध्ये दाखल केले. येथे त्यांनी शालेय शिक्षणही घेतले. याशिवाय त्यांनी क्रिकेटमधील बारकावेदेखील अात्मसात करण्यासाठी ग्राउंडमनची भूमिका साकारली. 

त्यामुळे त्यांना गाेलंदाजीची शैली अात्मसात करता अाली. यादरम्यान त्यांनी क्युरेटचीही मदत घेतली. याच ठिकाणी ते पाहत पाहत गाेलंदाजी शिकले. त्यामुळे त्यांनी नेटवरही गाेलंदाजीचा सराव सुरू केला. सरावासाठी अालेल्या फलंदाजांना गाेलंदाजी करण्याची संधीही त्यांना याच ठिकाणी मिळाली. यातून त्यांच्या गाेलंदाजीचा पाया विकसित झाला. पुढे बिग बॅशमधील रेडबाॅक्स टीमचे प्रशिक्षक डॅरेन बेरी यांची नजर नॅथन लाॅयनवर पडली. त्याच्यातील प्रतिभेने त्यांना प्रभावित केले. त्यांनी २०१०-११ च्या सत्रामध्ये अापल्या संघात सहभागी केले. यात ताे सर्वाधिक विकेट घेणारा गाेलंदाज ठरला. 
 
लाॅयन हा एक क्लासिकल अाॅफस्पिनर अाहे. त्याचे चेंंडूवर जबरदस्त नियंत्रण असते. त्याला दबावामध्ये यशस्वीपणे विकेट काढण्याची कला अवगत अाहे. याच शैलीमुळे  निवड समितीची नजर त्याच्यावर पडली. बिग बॅशमध्ये सात महिने खेळल्यानंतर त्याला राष्ट्रीय कसाेटी संघामध्ये स्थान मिळाले. त्याने अापल्या कसाेटी क्रिकेटमध्ये पहिली विकेट श्रीलंकेच्या दिग्गजकुमार संगकाराची घेतली.
 
त्याचे वैयक्तिक जीवनमान अधिकच सुंदर अाहे. ताे अापल्या फावल्या वेळेत कुटुंबीयांसाेबत असताे. त्याला हार्पर (२ )व मिला (१) या दाेन मुलीदेखील अाहेत. ताे दाैऱ्यावर  मुली व पत्नी मेलसाेबत जाण्याला पहिली पसंती देताे.

विक्रम 
{ अाॅस्ट्रेलियाकडून सर्वाधिक २३३ विकेट घेणारा स्पिनर
{ पाच सामन्यांच्या मालिकेत एकाही डावात बाद नाही, असे करणारा जगातला दुसरा क्रिकेटपटू
बातम्या आणखी आहेत...