आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Hockey Players Learned To Make Samosa And Nan

हॉकी सामन्याआधी ऑस्ट्रेलियन्स खेळाडूंची मस्ती, होटेलमध्ये बनवला समोसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला एक्सपेरियंस इंस्टाग्रामवर शेअर करताना ग्लेन सिमसनने हा फोटो पोस्ट केला आहे. - Divya Marathi
आपला एक्सपेरियंस इंस्टाग्रामवर शेअर करताना ग्लेन सिमसनने हा फोटो पोस्ट केला आहे.
रायपूर- येथे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हॉकी टेस्ट मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ रायपूर येथे पोहोचला. येथे पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रविवारी येथील हॉटेलच्या किचनमध्ये जबरदस्त मस्ती केली. दुसऱ्या टेस्टच्या आधी ऑस्ट्रेलियन हॉकी पटूंनी हॉटेलमध्ये नान आणि समोसा बनविला.
कसा बनवावा समोसा
आपला एक्सपेरियंस इंस्टाग्रामवर शेअर करताना ऑस्ट्रेलियन प्लेयर ग्लेन सिमसनने मस्तीच्या अंदाज पोस्ट केले...
1. सर्वाना किचनमध्ये बोलवा.
2. सर्वांच्या मस्तिचा तडका मारा.
3. नंतर डीप फ्राय करा
आज तीसरा सामना
रायपुरच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉकी स्टेडियमवर पहिला सामना भारत-आस्ट्रेलिया दरम्यान झाला होता. हा सामना रायपूरमधील पहिला आणि राज्यातील दुसरा इंटरनॅशनल सामना होता. आज सोमवारी होणारा तिसरा आणि शेवटचा सामनाही रायपूर येथेच खेळवला जाणार आहे.
दुसऱ्या सामन्यात काय झाले
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या हॉकी टेस्टमध्ये भारताला 2-1 ने पराभूत करून तीन सामन्यांनच्या मालिकेत 1-0 अशी अघाडी घेतली आहे. या विजयाचा हिरो जेवेलेस्की ठरला होता. तर पराभवाचा व्हिलन ठरला होता दानिश मुस्तफा. सामन्याच्या 48 व्या मिनिटाला जेवेलेस्कीने मारलेला शॉट अडवताना दानिशने स्वतःच बॉलला गोल पोस्टमध्ये मारले. मालिकेतील शेवटचा सामना आज (सोमवारी) खेळला जाणार आहे. पहिला टेस्ट सामना 2-2 ने बरोबरीत सुटला होता. या आधी संघाने नोव्हेंबर 2014 मध्ये कंगारूना त्यांच्याच देशात खेळल्या गेलेल्या टेस्ट मालिकेत 3-1 ने हारवले होते.
नंबर गेम
- 5 हजार प्रेक्षकांना पाहिला सामना
- 100 देशांमध्ये धाला टेलिकास्ट
- आज संध्याकाळी 6.30 पासून सुरू होणार तीसरा सामना
- शहरात सहा ठिकाणी स्क्रीनवर झाले लाइव्ह प्रक्षेपण

पुढील स्लाइड्सवर पाहा, रायपूरमध्ये एन्जॉय करताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे PHOTO...