आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open 2016: Angelique Kerber Ravish Serena Williams To Win Title

ऑस्ट्रेलियन ओपन: कर्बर नवी चॅम्पियन, सेरेनाला हरवून जिंकला ग्रँडस्लॅम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्बर नवी चॅम्पियन, - Divya Marathi
कर्बर नवी चॅम्पियन,
मेलबर्न- जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने जगातील अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पराभूत करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. जर्मनीच्या या २८ वर्षीय खेळाडूने २१ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाला ६-४, ३-६, ६-४ ने धूळ चारत यंदाच्या पहिल्याच ग्रँडस्लॅमवर मोहोर उमटवली.

सेरेनाचा खेळ व एकंदरीत अनुभव लक्षात घेता ही लढत तिच्यासाठी अत्यंत सोपी मानली जात होती. कारण तिने कर्बरविरोधात आतापर्यंत ६ पैकी ५ लढतीत विजय मिळवलेला आहे. परंतु २०१२ मध्ये सिनसिनाटी ओपन स्पर्धेत कर्बरने सेरेनाला पराभूत केले होते. या लढतीच्या पहिल्याच सेटमध्ये कर्बर आणि सेरेनात दमदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, कर्बर यात वरचढ ठरली आणि पहिलाच सेट ६-४ ने आपल्या नावे केला.

ग्रँडस्लॅममध्ये प्रथमच खेळणाऱ्या कर्बरला दुसऱ्या सेटचा अंदाज अाधीच आला. कारण सेरेना अशा सामन्यात दमदार पुनरागमन करते हे तिला माहिती आहे. नेमके हेच घडले आणि सेरेनाने दुसरा सेट ६-३ च्या फरकाने जिंकला आणि सामना पुन्हा आपल्या बाजूने झुकवला. परंतु तिसऱ्या सेटमध्ये कर्बरने सेरेनावर दबाव बनवत ६-४ ने सेट जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तबही केले. या विजयासोबतच कर्बनरने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

कर्बरने दोनदा केल्या सर्व्हिस ब्रेक
पहिल्याच सेटमध्ये कर्बरने दोन वेळा सेरेनाच्या सर्व्हिस ब्रेक करत ३९ मिनिटांत विजय नाेंदवला. दुसरा सेट ३३ मिनिटे चालला, तर तिसऱ्या सेटमध्ये मात्र मोठा संघर्ष पाहायला मिळाला. ही लढत सुमारे २ तास ८ मिनिटे चालली.

मरे आणि सोरेसला दुहेरीचे विजेतेपद
ब्रिटनचा जॅमी मरे आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जोडीने कॅनडाचा डेनियल नेस्टर अाणि झेक गणराज्यचा रादेक स्टेपानेकच्या जोडीला २ तास १९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २-६, ६-४, ७-५ ने हरवले. जॅमी हा अँडी मरेचा थोरला भाऊ आहे. अँडी मरे रविवारी जगातील अव्वल खेळाडू आणि पाचवेळचा चॅम्पियन नोवाक योकोविकशी विजेतपदाची झुंज देईल. जॅमी आणि सोरेस प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत होते.

सेरेनाच्या पहिल्या विजयावेळी कर्बर ११ वर्षांची
कर्बर ही सेरेनाचा खेळ पाहूनच लहानाची मोठी झाली आहे. सेरेना विल्यम्सने १९९९ मध्ये यूएस ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावून पहिला ग्रँडस्लॅम जिंकला होता तेव्हा अँजेलिक कर्बर फक्त ११ वर्षांची होती. त्यानंतर सेरेनाने २१ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आणि कर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिचा हा विजयरथ रोखला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्यातील काही खास क्षणाचे PHOTOS...