आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open: Djokovic, Serena Win, Sania Defeat Martina

अाॅस्ट्रेलियन अाेपन: याेकाेविक, सेरेनाचा विजय; सानियाची मार्टिनावर मात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- गत चॅम्पियन अाणि जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक, सेरेना विल्यम्सने गुरुवारी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. सर्बियाच्या याेकाेविकने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या राॅजर फेडररचा पराभव केला. त्याने अवघ्या ७९ मिनिटांत सामना जिंकला.
अमेरिकेच्या सेरेनाने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात रंदावास्काचा पराभव केला. तसेच सानिया अाणि डाेडिंगने मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीच्या लढतीत स्वीसच्या मार्टिना हिंगीसवर मात केली.

पाच वेळचा चॅम्पियन याेकाेविक अाणि चार वेळचा किताब विजेता फेडरर यांच्यात काट्याची लढत रंगण्याची अाशा केली जात हाेती. मात्र, १७ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियनला तिसऱ्या सेटमध्येच संघर्ष करता अाला. सर्बियाच्या याेकाेविकने सरस खेळी करून ६-१, ६-२, ३-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकून सहाव्यांदा फायनलमधील प्रवेश निश्चित केला.

याेकाेविकने दमदार सुरुवात करताना पहिले दाेन सेट अवघ्या ५४ मिनिटांत जिंकले. त्यानंतर पुनरागमन करताना फेडररने तिसऱ्या सेटमध्ये जाेर लावला. त्यामुळे त्याला ६-३ ने बाजी मारता अाली. मात्र, चाैथ्या सेटमध्ये त्याला प्रत्युत्तराची एकही संधी मिळाली नाही. याचा फायदा घेत याेकाेविकने चाैथा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला. त्यामुळे त्याला फायनलमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. पराभवासह राॅजर फेडरर स्पर्धेतून बाहेर पडला अाहे.

सामन्यातील खास
- याेकाेविकने ९ ब्रेक पॉइंटसह पाच वेळा फेडररची सर्व्हिस ब्रेक केली.
- फेडररने चारपैकी एकाच वेळी याेकाेविकची सर्व्हिस ब्रेक केली.
- याेकाेविकने ३३ विनर्स मारले अाणि २० फाॅल्ट केले.
- फेडररला ३४ विनर्स अाणि ५१ फाॅल्ट करता अाले
- पहिल्या अाणि दुसऱ्या सेटमध्ये याेकाेविक सर्वाेत्कृष्ट सिद्ध झाला.
- फेडररने तिसरा सेट ६-३ ने जिंकला. मात्र, याेकाेविकने चाैथ्या सेटच्या अाठव्या गेममध्ये फेडररची सर्व्हिस माेडून विजय मिळवला.
विक्रमाची करू शकताे बराेबरी
याेकाेविकने अातापर्यंत २००८, २०११, २०१२, २०१३ अाणि २०१५ मध्ये अाॅस्ट्रेलियन अाेपनचा किताब जिंकला अाहे. यंदाची फायनल जिंकल्यास त्याला अाॅस्ट्रेलियाच्या राॅड लेवरच्या सहा वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाची बराेबरी करता येईल.

सेरेना, केर्बरचा सहज विजय
०७- व्यांदा सेरेना फायनलमध्ये
०६- वेळा किताब जिंकला
२२- व्या ग्रँडस्लॅमची संधी
जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स अाणि सातवी मानांकित अँजेलिक केर्बर यांच्यात महिला एकेरीच्या किताबासाठी फायनल रंगणार अाहे. सेरेनाने उपांत्य सामन्यात अग्निजस्का रदावांस्कावर मात केली. तिने ६-०, ६-४ अशा फरकाने विजय मिळवून सातव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केर्बरने विजय मिळवला. तिने जाेहाना काेंतावर ७-५, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला.

सानिया- डाेडिंग विजयी; पेस-मार्टिना पराभूत
सानियाने सहकारी मार्टिना हिंगीसला धूळ चारली. तिने मिश्र दुहेरीत क्राेएशियाचा युवा खेळाडू इवान डाेंडिगसाेबत मिश्र दुहेरीचा उपांत्यपूर्व सामना जिंकला. सानिया अाणि डाेडिंगने अंतिम अाठमध्ये भारताचा लिएंडर पेस अाणि स्वीसच्या मार्टिनावर ७-६, ६-३ ने मात केली. या जाेडीने एक तास १० मिनिटांत एकतर्फी विजय साकारला. यासह त्यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम चारमध्ये धडक मारली.