आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open: Sania Mirza And Martina Hingis In Semifinal

सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीस किताबापासून एका पावलावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जगातली नंबर वन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन, यूएस ओपनसह दुहेरीचे ९ किताब जिंकणारी अव्वल मानांकित जोडी सानिया-हिंगीसने जर्मनीची ज्युलिया जॉर्जिस आणि चेक गणराज्यची कॅरोलिना प्लिस्कोवा या १३ व्या मानांकित जोडीला ६-१, ६-० ने नमवले. सानिया-हिंगीसने योग्य ताळमेळ ठेवून शानदार खेळ करत विरोधी जोडीवर विजय मिळवला. विरोधी जोडीला दोन सेटमध्ये केवळ एक गेम जिंकला आला. सानिया-हिंगीसने नेट ड्रॉप व वॉलिसचे शानदार प्रदर्शन केले. सानिया-हिंगीसचा हा विक्रमी ३५ वा सलग विजय ठरला आहे.

पहिल्या सेटमध्ये १-१ अशा बरोबरीनंतर अव्वल मानांकित जोडीने जबरदस्त खेळ करून सलग ११ गेम जिंकत सामना आपल्या नावे केला. सानिया-हिंगीसने विरोधी जोडीची सर्व्हिस पाच वेळा मोडली. सानिया-हिंगीसला सामन्यात आठ वेळा सर्व्हिस मोडण्याची संधी मिळाली. यापैकी पाच वेळा त्यांनी या संधीचे सोने केले. दुसरीकडे जाॅर्जिया आणि प्लिसकोवा यांना चारपैकी एकही वेळा सर्व्हिस मोडता आली नाही.

विजेता जोडीने पहिल्या सर्व्हिसवर ७२ टक्के, तर दुसऱ्या सर्व्हिसवर ५६ टक्के गुण मिळवले. त्यांनी सामन्यांत एकूण २३ विनर्स मारले आणि केवळ १० साध्या चुका केल्या. जॉर्जिया-प्लिसकोवाने सामन्यात २२ साध्या चुका केल्या. त्यांना या चुका महागात पडल्या. सानिया-हिंगीससमोर आता फायनलमध्ये चेक गणराज्यची आंद्रिया लावाकोवा आणि लुसी रादेका यांच्याशी झुंज होईल. या दोघींनी सेमीफायनलमध्ये चीनची यी फान जू आणि सेईसेई झेंग या १५ व्या मानांकित जोडीला ३-६, ६-३, ६-१ ने हरवले.

बोपन्नाचा पराभव :
तिसरा मानांकित भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याची जोडीदार चान यंग जान यांना मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या दोघांना स्लोवाकियाची अांद्रेजा क्लिपाक आणि फिलिपिंसचा ट्रीट हुए यांनी २-६, ५-७ ने मात दिली.

मरे, राओनिक अंतिम चारमध्ये दाखल
दुसरा मानांकित अँडी मरेने स्पेनच्या फेररला तीन तास आणि २० मिनिटांच्या संघर्षानंतर ६-३, ६-७, ६-२, ६-३ ने पराभूत करून सहाव्यांदा अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.े कॅनडाच्या एम. राओनिकने फ्रान्सच्या जी. मोंफिल्सला ६-३, ३-६, ६-३, ६-४ ने पराभूत करून सेमीत प्रवेश केला.

कोंता-कर्बर यांच्यात होणार सेमीची लढत
महिला एकेरीत ब्रिटनच्या जोहान कोंताने चीनची क्वालिफायर खेळाडू शुआई झांगला ६-४, ६-१ ने पराभूत करून सेमीफायनल प्रवेश केला. सातवी मानांकित अँजोलिक कर्बरने दोन वेळेसची चॅम्पियन बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाला ६-३, ७-५ ने पराभूत करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये आता कोंता-कर्बर सामना होईल.