आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: योकोविक, सेरेना तिसऱ्या फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जगातला नंबर वन सर्बियाचा नोवाक योकोविक आणि अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील आपले विजयी अभियान कायम ठेवले. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिसरा मानांकित रॉजर फेडरर तर महिला गटात चौथी मानांकित एग्निजस्का रदवांस्का, पाचवी मानांकित मारिया शारापोवा यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सहावी मानांकित पेत्रा क्वितोवाला पराभवाचा धक्का बसला.

अव्वल मानांकित योकोविकने फ्रान्सच्या क्विंटन हेल्सला सरळ सेटमध्ये ६-१, ६-२, ७-६ ने मात दिली. २२ व्या ग्रँडस्लॅमच्या लक्ष्याने खेळणाऱ्या सेरेना विल्यम्सने तैवानच्या सेह सू वेईला ६-१, ६-२ ने हरवले. पोलंडच्या रदवांस्काने कॅनडाच्या युजनी बुकार्डला ६-४, ६-२ ने मात दिली. तर शारापोवाने बिगर मानांकित बेलारुसच्या एलिक्झांद्रा सास्नोविचला ६-२, ६-१ ने पराभूत केले. क्वितोवाला बिगर मानांकित डारिया गावरिलोवाने ६-४, ६-४ ने मात दिली.

फेडररचा २९९ वा विजय : १७ ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने युक्रेनच्या अॅलेक्झांद्रा डोलगोपोलोवला ६-३, ७-५, ६-१ ने हरवले. हा फेडररचा ग्रँडस्लॅममध्ये २९९ वा विजय ठरला. तिसऱ्या फेरीत फेडररसमोर बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव असेल. पुरुष गटात सातवा मानांकित जपानचा केई निशिकोरी, नववा मानांकित फ्रान्सचा जो. विल्फ्रेड सोंगा, सहावा मानांकित चेक गणराज्यचा टॉमस बर्डिच यांनीही तिसरी फेरी गाठली. निशिकोरीने अमेरिकेच्या ऑस्टिन क्राजिसकेला ६-३, ७-६, ६-३ ने, सोंगाने ऑस्ट्रेलियाच्या जेसिकाला ७-५, ६-१, ६-४ ने, बर्डिचने बोस्नियाच्या बेसिकला ६-४, ६-०, ६-३ ने मात दिली.
भूपती दुसऱ्या फेरीत, पेसचा पराभव
पुरुष दुहेरीत भारताच्या महेश भूपतीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर िलएंडर पेसचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. भूपतीने जोडीदार मुलरसह ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स बोल्ट आणि अँड्रयू विटिंगटन यांना ७-६, ३-६, ६-४ ने हरवले. पेस आणि त्याचा जोडीदार फ्रान्सचा जर्मी चार्डीला १२ वी मानांकित जोडी कोलंबियाचा जुआन सेबस्तियान कबाल आणि रॉबर्ट फराह यांनी ३-६, ४-६ ने पराभूत केले.