आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडल विजेत्या सिंधू-साक्षीवर बक्षिसांचा वर्षाव सुरूच, आतापर्यंत मिळाले 18.5 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्वर मेडल विजेत्या पी.व्ही. सिंधूला आतापर्यंत 13.5 कोटी रूपये तर साक्षी मलिकला 4 कोटी 91 लाख रूपयांच्या बक्षिसांची घोषणा झालेली आहे. - Divya Marathi
सिल्वर मेडल विजेत्या पी.व्ही. सिंधूला आतापर्यंत 13.5 कोटी रूपये तर साक्षी मलिकला 4 कोटी 91 लाख रूपयांच्या बक्षिसांची घोषणा झालेली आहे.
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्वर मेडल विनर पी व्ही सिंधू आणि ब्राँझ मेडल विनर साक्षी मलिकचे मायदेशात जोरदार स्वागत झाले. सिंधूची तर हैदराबादमध्ये डबल डेकर बसमध्ये 32 किमीपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. तर साक्षीचे स्वागत करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी एयरपोर्टवर हरियाणा सरकारचे 5 मंत्री हजर झाले. बहादुरगडमध्ये साक्षीचा भव्य सन्मान सोहळा झाला. सिंधूला मिळणार सचिन तेंडुलकरकड़ून BMW...
- पी व्ही सिंधू सिल्वर मेडलिस्ट आहे त्यामुळे तिच्यावर साक्षीपेक्षा बक्षिसांचा जास्त वर्षाव झाला आहे. तिला आतापर्यंत 13.5 कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
- याचसोबत सिंधूला पुढील महिन्यात दोन BMW मिळतील. यातील एक हैदराबाद डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन देईल तर दुसरी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर देणार आहे.
- सिंधूला सर्वात जास्त 5 कोटी रूपयांचे बक्षिस तेलंगणा सरकार देणार आहे.
- तर, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सन्मान सोहळ्यातच सिंधूला 3 कोटीचा चेक दिला.
- सिंधूला दिल्ली सरकारने 2 कोटी, मध्य प्रदेश आणि हरियाणा सरकारने 50 लाख रूपये, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडने 75 लाख, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने 50 लाख, स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने 50 लाख आदी बक्षिसांची घोषणा केली आहे.
साक्षी मलिकला 5 कोटींची बक्षिसे-
- साक्षी मलिकला ब्राँझ जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह अनेकांनी कोट्यावधीची बक्षिसे जाहीर केली आहेत.
- साक्षीला आतापर्यंत एकून 4.91 कोटी रूपयांच्या बक्षिसांची घोषणा झाली आहे. बहादुरगड सन्मान सोहळ्यात सीएम खट्टर यांनी साक्षीला 2.5 कोटी रूपयांचा चेक दिला आहे.
- हरियाणा सरकारने साक्षीला राज्याच्या 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' योजनचे ब्रॅंड अम्बेसेडर बनवले आहे.
- साक्षीला दिल्ली सरकारने 1 कोटी, रेल्वे मिनिस्ट्रीने तसेच स्पोर्ट्स मिनिस्ट्री 30 लाख रुपये देणार आहे तर, इंडियन ऑलिंपिक असोसिएशन आदी लोकही लाखोंचे बक्षिस देणार आहे.
सिंधूचे ऑलिंपिकमध्ये अचिव्हमेंट
- ऑलिंपिकमध्ये देशाला मेडल मिळवून देणारी सिंधू सर्वात तरूण खेळाडू.
- 21 वर्षाच्या सिंधूने बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले तर ऑलिंपिक इतिहासातील 6 वे सिल्वर मिळवून दिले.
- 92 वर्षात भारतासाठी सिल्वर जिंकणारी पहिली भारतीय महिला.
साक्षीचे ऑलिंपिकमध्ये अचिव्हमेंट
- रिओत भारताला पहिले मेडल जिंकून देणारी रेसलर साक्षीने ब्राँझ जिंकून दिले.
- ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकणारी भारताची चौथी महिला खेळाडू
- रेसिलिंगमध्ये भारतीय महिला खेळाडूने प्रथमच मेडल जिंकून दिले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिंधु आणि साक्षीला कोणी किती रूपयांची केली बक्षिसांची घोषणा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...