आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अझलन शाह चषक हाॅकी: भारतासाठी करा वा मरा; मलेशियाविरुद्ध अाज झुंज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपाेह - पाच वेळचा चॅम्पियन भारतीय संघ अझलन शाह चषक हाॅकी स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशासाठी उत्सुक अाहे. यासाठी भारताला शुक्रवारी यजमान मलेशियाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. गत सामन्यातील पराभवाने भारतीय संघाला मलेशियाविरुद्ध विजयाने फायनलमधील प्रवेश निश्चित करता येईल. यातून भारतासाठी हा सामना करा वा मरा असा अाहे. त्यामुळे या सामन्यात यजमान टीमला धूळ चारून अंतिम फेरीत धडक मारण्याचा भारताचा प्रयत्न असेल. गत वर्षी भारतीय हाॅकी टीमने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले हाेते. मात्र, यंदा या स्पर्धेत साेनेरी यश संपादन करण्याचा भारतीय टीमचा इरादा अाहे. वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलिया टीमने फायनलमध्ये धडक मारली अाहे. या टीमचे सर्वाधिक १५ गुण अाहेत.
बातम्या आणखी आहेत...