आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azalan Shah Cup Hockey : India Pakistan Today Play Final

अझलन शाह चषक हाॅकी: भारत-पाकिस्तान अाज महामुकाबला रंगणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपाेह - गत सामन्यातील विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ अाता किताबाच्या शर्यतीतील अापले अाव्हान कायम ठेवण्यास उत्सुक अाहे. यासाठी भारतीय संघ २५ व्या अझलन शाह चषक हाॅकी स्पर्धेतील अापला चाैथा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला. मंगळवारी स्पर्धेत कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान यांच्यात काट्याची लढत रंगणार अाहे.

पाच वेळचा चॅम्पियन भारतीय संघाने गत सामन्यात कॅनडाला धूळ चारली. यासह फायनलमधील प्रवेशाच्या अापल्या अाशा कायम ठेवल्या. अाता दाेन विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर अाहे. पाकचा धुव्वा उडवून अापले स्थान अधिक मजबूत करण्याचा भारतीय हाॅकी टीमचा प्रयत्न असेल.

गतवर्षी भारताने कांस्यपदक पटकावले हाेते. अाता सुवर्णपदकाचा बहुमान पटकावण्याचा टीमचा प्रयत्न अाहे. यासाठी सरदाराच्या नेतृत्वात खेळाडू फाॅर्मात अाहे. तलविंदर सिंग, मनप्रीत व हरमनप्रीतसारखे खेळाडू अव्वल कामगिरीस उत्सुक अाहेत.
दुसरीकडे पाकिस्तान टीम सध्या पराभवाच्या गर्तेत सापडली अाहे. पाकला अद्याप एकच विजय मिळवता अाला. या टीमने कॅनडावर मात केली हाेती. मात्र, पाकला अाॅस्ट्रेलिया अाणि न्यूझीलंडने धूळ चारली अाहे. वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलिया अव्वल अाणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर अाहे.