आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azalan Shah Hockey Cup: India Australia Play Final Match

अझलन शाह चषक हाॅकी: भारत-अाॅस्ट्रेलिया अाज फायनल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपाेह - पाच वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाने शुक्रवारी २५ व्या अझलन शाह चषक हाॅकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताने ‘करा वा मरा’ असलेल्या सामन्यात यजमान मलेशियाचा धुव्वा उडवला. गतवर्षीच्या कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह भारताला अाव्हान कायम ठेवून फायनल गाठता अाली. अाता भारताचा अंतिम सामना शनिवारी अाॅस्ट्रेलियाशी हाेईल.

एस. व्ही. सुनील (२ मि.), हरजित सिंग (७ मि.), रमणदीप सिंग (२५, २९ मि.), दानिश मुज्तबा (२७ मि.) अाणि तलविंदर सिंग (५० मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर भारतीय संघाने हा सामना जिंकला.

अाॅस्ट्रेलियाची कॅनडावर मात : अाॅस्ट्रेलियाने शुक्रवारी कॅनडावर ३-० ने एकतर्फी विजय संपादन केला. कर्णधार मार्क (१६ मि.), ब्लॅक गाेवर्स (३३ मि.) व अाेगिलीव्हे (३६ मि.) यांनी अाॅस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

पाक-कॅनडा अाज लढत
स्पर्धेतील पाचव्या स्थानासाठी शनिवारी पाकिस्तान अाणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार अाहे. पाक टीमचे सहा गुण अाहेत. मात्र, या टीमला अव्वल चारमध्ये स्थान मिळवता अाले नाही. दुसरीकडे कॅनडा टीम पराभवाच्या गर्तेत सापडली अाहे.