आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएनबी परिबास अाेपन : अझारेंकाची सेेरेनावर मात; याेकाेविकही चॅम्पियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियाना वेल्स - जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि व्हिक्टाेरिया अझारेंका पीएनबी परिबास अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या दाेघांनीही अनुक्रमे पुरुष अाणि महिला एकेरीचा किताब पटकावला. सर्बियाचा याेकाेविक हा पाचव्यांदा या स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा मानकरी ठरला. त्याने सरळ दाेन सेटमध्ये एकेरीची फायनल जिंकून हा बहुमान पटकावला.
अव्वल मानांकित याेकोविकने अंतिम सामन्यात कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकचा पराभव केला. त्याने ६-२, ६-० अशा फरकाने सामना जिंकला. याशिवाय त्याने यंदाच्या सत्रात २२ व्या विजयाची नाेंद केली. पहिल्या सेटवर राअाेनिकने दमदार खेळी करताना याेकाेविकला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अव्वल मानांकित खेळाडूने सरस खेळी करून हा सेट जिंकला. याशिवाय त्याने लढतीत अाघाडी मिळवली. त्यानंतर त्याने दुसरा सेट सहज जिंकून सामना अापल्या नावे केला. माजी नंबर वन राफेल नदालचा पराभव करून याेकाेविकने फायनल गाठली हाेती.

अझारेंकाची सेरेनावर मात
बेलारूसच्या व्हिक्टाेरिया अझारेंकाने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सेरेनाचा पराभव केला. तिने रंगतदार सामन्यात ६-४, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजय साकारला. यासह तिने विजेतेपद अापल्या नावे केले. या सामन्यातील पराभवाने नंबर वन सेरेनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बातम्या आणखी आहेत...