आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Stylish Indian Badminton Player Jwala Gutta Birthday Special

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: अझहरूद्दीनबरोबर अफेअरमुळे चर्चेत आली होती ही बॅडमिंटन स्टार, पाहा PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या स्टायलिश प्लेअर्स पैकी एक आहे ज्वाला गुट्टा. - Divya Marathi
भारताच्या स्टायलिश प्लेअर्स पैकी एक आहे ज्वाला गुट्टा.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा 7 सप्टेंबरला आपला 32 वा जन्मदिवस सेलिब्रेट करत आहे. ज्वाला बॅडमिंटनमधील सर्वात ग्लॅमरस खेळाडूं पैकी एक आहे. महिला दुहेरीतील एक्स्पर्ट असलेल्या ज्वालाने 2013 मध्ये साउथ इंडिअन सिनेमांमध्ये आयटम नंबरही केले आहे.

स्टायलीश स्पोर्ट स्टार आहे ज्वाला
देशातील सर्वात स्टायलीश आणि ग्लॅमरस स्पोर्ट स्टारमध्ये ज्वालाचादेखील समावेश होतो. ती एक स्मार्ट ड्रेसरही आहे. ज्याप्रमाणे ती कोर्टवर कलरफूल लूकमध्ये दिसते त्याच प्रमाणे कोर्टच्या बाहेरही ती तिच्या स्टईलमुळे चर्चेत असते. ज्वाला तिच्या स्टाईलमुळे कधी फॅशन मॅगझीनच्या कव्हरवर झळकली तर, तर कधी तेलुगु सिनेमांमध्ये डांस करतानाही दिसली.

पर्सनल लाइफः
ज्वाला हैद्राबादमध्ये राहते. मात्र तिचा जन्म महाराष्ट्रतील वर्धा येथे झाला आहे. तिचे वडिल क्रांति गुट्टा हे एका स्वतंत्रता सेनानिच्या कुटूंबातील असून, आई येलेना चीनच्या तियानजिन येथील आहे. ज्वालाच्या आईला लिखानाची विशेष आवड आहे. त्यंनी महात्मा गांधींच्या आत्मकथेचे ट्रांसलेशनही केले आहे.
डिव्हर्समुळेही राहिली चर्चेत
बॅडमिंटन करिअरदरम्यान ज्वाला गुट्टा बॅडमिंटनपटू चेतन आनंदला डेट केरायची. 17 जुलै 2005 रोजी हे दोघे लग्नाच्या बंधनातही अडकले, मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. या दोघांचा जून 2011 मध्ये डिव्हर्स झाला. या ब्रेकअपची माध्यमांमध्ये बरीच चर्चाही झाली. माध्यमांमध्ये अशीही चर्चाही होती की, क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीनला डेट केल्यामुळेच हा डिव्हर्स झाला. मात्र त्याच वेळी ज्वाला आणि अझहर यानी या बातम्यांमध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा खुलासा केला होता.

ज्वालाला व्हायचे होते टेनिस प्लेयर
ज्वालाला लहाणपणी टेनिस प्लेयर व्हयचे होते, मात्र ती नंतर बॅडमिंटनकडे आकर्षित झाली. मागच्या वर्षीच तिने देशाला ग्लासगो येथे झालेल्या खेळांमध्ये सिल्व्हर मेडल मिळऊन दिले.

ज्वाला गुट्टाचे करिअर
2006 कॉमनवेल्थ गेम्समध्ये - ब्रॉन्झ
2010 कॉमनवेल्थ गेम्स - महिला डबल्समध्ये गोल्ड, मिक्स्ड टीममध्ये सिल्व्हर
2014 कॉमनवेल्थ गेम्समध्ये – सिल्व्हर
2011 मध्ये तिचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
2013 पर्यंत ज्वालाने एकूण 14 वेळा नॅशनल बॅडमिंटन चॅम्पिअनशिप जिंकली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ज्वाला गुट्टाचे काही ग्लॅमरस फोटो...