आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बास्केटबॉल टीम खरेदीची ओबामा यांची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा कार्यकाळ संपायला आता केवळ ६ महिने शिल्लक आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण असतील यावर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, व्हाइट हाऊस सोडल्यानंतर बराक ओबामा काय करतील याची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. काही लोकांच्या मते ओबामा यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देतील, तर काहींच्या मते ओबामा होनोलुलू किंवा पॉल स्प्रिंग्ज येथे प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. मात्र, नेहमी वेगळ्या कामासाठी चर्चेत असलेले ओबामा या वेळीसुद्धा काही वेगळाच विचार करत आहेत. आपल्या मुलींनंतर ओबामा सर्वाधिक प्रेम बास्केटबॉलवर करतात. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बास्केटबॉलशी जुळण्याची त्यांची योजना असल्याची चर्चा आहे.

ओबामा बास्केटबॉलची टीम खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. खरे तर एनबीएच्या एका फ्रँचायझीचे नेटवर्थ त्यांच्या एकूण संपत्तीच्या दहापट अधिक आहे. यामुळे ओबामा एनबीएच्या संघातील काही टक्के भागीदारी खरेदी करू शकतात. सध्यातरी याबाबत केवळ अंदाजच व्यक्त होत आहेत. ओबामा बास्केटबॉलचे मोठे चाहते आहेत हे जगजाहीर आहे. या खेळासाठी त्यांचे प्रेम इतके अधिक आहे की, त्यांची छोटी मुलगी साशाच्या स्कूलच्या बास्केटबॉल संघाला कोचिंग देण्यासाठी ते सर्वात पुढे होते. पत्नी मिशेल यांची पहिली भेटसुद्धा शिकागो बुल्सच्या एका सामन्याच्या वेळी झाली होती.

ओबामांच्या संपत्तीपेक्षा १० पट अधिक टीमचे नेटवर्थ
ओबामा यांचे वेतन वार्षिक ४ लाख डॉलर (२७ कोटी रु.) आहे. त्यांची एकूण संपत्ती ८२ कोटी रुपये आहे. फोर्ब्जनुसार एनबीए फ्रँचायझीच्या नेटवर्थमध्ये १३ टक्के नफा झाला आहे. आता एका फ्रँचायझीचे नेटवर्थ ८४७ कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे ओबामा एक टीम तर खरेदी करू शकणार नाहीत, मात्र संघात काही टक्के भागीदारी घेऊ शकतील.
बातम्या आणखी आहेत...