आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्यात इतके साम्य की ३५० वर्षांआधीचे चित्रकाराच्या सेल्फ पोर्ट्रेटला समजू लागले मेसीचे पूर्वज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅमस्टरडॅम - जगभरात असे बरेच लोक आहेत, ज्यांचा चेहरा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसीशी मिळताजुळता आहे. पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाह यापैकी एक आहे. अफगाणिस्तानच्या एका शिक्षकाचा चेहरा आणि शरीरही मेसीसारखेच आहे. हा विषय निघण्याचे कारण असे की, हॉलंडच्या अॅमस्टरडॅमच्या रिक्स म्युझियममध्ये एक पोर्ट्रेट लागले असून त्या पोर्ट्रेटचा चेहरा बार्सिलोनाचा स्टार फॉरवर्ड मेसीशी जुळणारा आहे. तेथे येणारे अनेक जण याला प्रथमदर्शनी मेसीचे पेंटिंग समजतात. असे यामुळे की दोघांच्या चेहऱ्यात खूप समानता आहे. दोघांची हेअरस्टाइलही जवळपास एकसारखी आहे. हे पोर्ट्रेट हॉलंडचा कलाकार आंद्रियन वान डेर वेर्फेचे आहे. रोटरडॅम येथे ३५० वर्षांपूर्वी २१ जानेवारी १६५९ रोजी जन्मलेला आंद्रियन आपली चित्रकला, स्क्लप्चर आणि आर्किटेक्चरसाठी खूप प्रसिद्ध होता. त्याने वयाच्या ४० व्या वर्षी आपले हे पोर्ट्रेट बनवले. या म्युझियममध्ये पहिल्यांदा येणारे तर याला मेसीचेच पोर्ट्रेट समजतात. काही जण तर विनोदात आंद्रियनला मेसीचा पूर्वजही म्हणतात. हे पोर्ट्रेट म्युझियममध्ये लागल्यानंतर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.
सध्या तरी मेसीची टीम बार्सिलोना ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगमध्ये त्याच्याशिवाय खेळत आहे. मेसी सध्या दुखापतीमुळे तीन आठवडे मैदानापासून बाहेर आहे. तो चॅॅम्पियन्स लीगमध्ये बोरुसिया मोनचेनग्लेडबाक आणि ला लीगामध्ये सेल्टा विगोविरुद्ध सामना खेळू शकला नव्हता. तर पेरु, पेराग्वेविरुद्ध अर्जेंटिनाकडून तसेच वर्ल्डकप क्वालिफायरमध्येही तो खेळू शकला नाही. दुखापतीपासून तो त्रस्त आहे.
बातम्या आणखी आहेत...