आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनबीए हेच लक्ष्य! दोन वर्षे भारतासाठी खेळणार नाही, सतनामसिंगची स्पष्टाेक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - मी प्रथमत: माझ्या खेळात आणखी कौशल्य िमळवणे आणि एनबीए संघ डलास मॅवरिक्सकडून खेळण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे दोन वर्षे तरी देशाकडून खेळू शकणार नाही, असे भारताचे बास्केटबाॅलमधील नवे सेन्सेशन सतनामसिंग भामराने स्पष्ट केले आहे.

हुनान (चीन) येथे ३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फिबा आशियाई बास्केटबाॅल चॅम्पियनशिपसाठी भारताने पात्रता िमळवली आहे. मात्र, दोन वर्षे आपण केवळ एनबीएवरच लक्ष केंद्रित करणार आहोत, असे भामराने सांगितल्यामुळे तो संघात असणार नाही.
दोन वर्षांनंतर मी बास्केटबाॅलमध्ये जागतिक स्तरावर आपली चांगली ओळख िनर्माण केल्यानंतरच भारताकडून खेळेन. किमान १० वर्षे एनबीए लीग खेळण्याचे माझे मुख्य उद्दिष्ट आहे, असे ७ फूट २ इंच उंचीच्या बास्केटबाॅलपटूने डलासहून काॅन्फरन्स काॅलद्वारे भारतीय क्रीडा पत्रकारांशी बोलताना सांगितले. आणखी िकती भारतीय खेळाडू एनबीए खेळू शकतात, असे िवचारले असता मुंबईतील एनबीए अकादमीत अनेक प्रतिभावान बास्केटबाॅलपटू असून ते चांगल्याप्रकारे घडताहेत. त्यापैकी काहींना एनबीएमध्ये बोलावले जाऊ शकते. मात्र, तेथील दर्जा बघता सध्या ते घेताहेत त्यापेक्षा दुप्पट परिश्रम त्यांना घ्यावे लागतील, असे सतनाम म्हणाला.
एनबीएत पहिला भारतीय
सतनामसिंग भामरा हा अमेरिकेतील प्रतिष्ठेची एनबीए लीग खेळणारा पहिला भारतीय बास्केटबाॅलपटू अाहे. त्याने एनबीए उन्हाळी लीगमध्ये मॅवरिक्सकडून कारकीर्दीला सुरुवात केली. यासंदर्भात बोलताना माझ्यावर कोणतेही दडपण नाही िकंवा मी िनराशही नाही असे तो म्हणाला. मी पहिला भारतीय म्हणून येथे प्रवेश िमळवला आहे. आता मी कशी कामगिरी करतो तेच बघायचे आहे. आपण अमेरिकन खेळाडूंपेक्षा उत्तम खेळू शकतो, याचा मला िवश्वास आहे, केवळ संतुलन राखण्यात काही उणिवा असून प्रशिक्षक त्यावर परिश्रम घेत आहेत, असे उत्तरही त्याने िदले.