आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकहॅमचे ४४००० फूट उंचीवर पुशअप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - डेव्हिड बेकहॅम एखादे आव्हान स्वीकारतो तेव्हा ते तो सहजपणे पूर्ण करत नाही, उलट त्या आव्हानाला तो अधिक आव्हानात्मक करतो. चित्रपट निर्माता गाय रिचीने बेकहॅमला रोज २२ पुशअप्स करण्याचे आव्हान दिले आहे. बेहकॅमने हे आव्हान स्वीकारले असून त्याने ४४ हजार फूट उंचीवर पुशअप्स केले. हे आव्हान का सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे होते. या कॅम्पेनच्या माध्यमाने आर्मी वेटरनसाठी पैसे गोळा केले जात आहेत. या अंतर्गत २२ दिवस रोज पुशअप्स करावे लागतील.
बेकहॅम म्हणाला, “मी रिचीचे आव्हान स्वीकारले आहे. हे माझ्या दैनंदिनीचा एक भाग आहे. यात मला कोणाला हरवायचे नाही. उलट हे चांगल्या कामासाठी आहे. या माध्यमाने आपण लोकांचे आयुष्य वाचवू शकतो. जे सैनिक आत्महत्या करतात, त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू आहे. माझ्याशिवाय आणखी काही सेलिब्रिटी याच्याशी जुळत आहेत.’ बेकहॅमने पहिल्या दिवशी आपल्या खासगी जेटमध्ये ४४ हजार फूट उंचीवर, तर दुसऱ्या दिवशी पियानोवर पुशअप्स केले. तो रोज २२ दिवस वेगवेगळ्या जागी पुशअप्स करेल. विमानात पुशअप्स करतानाचा आपला एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला आतापर्यंत ३५ लाख लोकांनी पाहिले आहे. बेकहॅमने पियानोवर पुशअप्स केले तेव्हा त्याचा स्पोर्ट््स एजंट डेव गार्डनर पियानो वाजवत होता.
एका अहवालानुसार इंग्लंडमध्ये रोज २२ सैनिक कोणत्या न कोणत्या कारणामुळे आत्महत्या करतात. यातील बहुतेक सैनिक कुटुंबापासून दूर असल्यामुळे निराशेत येऊन आत्महत्या करत असल्याचे वृत्त आहे. पुशअप्सचे हे कॅम्पेन आइसबकेट पद्धतीने सुरू करण्यात आले. आइस बकेट चॅलेंजमध्ये एक व्यक्ती आपल्या डोक्यावर बर्फाने भरलेली बकेट उलटी करतो. हे कॅम्पेन मोटार न्यूरोन डिसीझबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...