आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाल वाॅरियर्सने ३१-२८ ने जिंकला सामना; पुणेरी पलटणचा अाठवा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये बंगाल वाॅरियर्सने शानदार तिसऱ्या विजयाची नाेंद केली. या टीमने गुरुवारी पुणेरी पलटणचा पराभव केला. फाॅर्मात अालेल्या बंगालने ३१-२८ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयाच्या बळावर बंगालच्या टीमने २१ गुणांसह गुणतालिकेतील अापले सातवे स्थान कायम ठेवले. दुसरीकडे पुणेरी पलटणचा हा अाठवा पराभव ठरला. हा पराभवासह पुण्याच्या टीमला गुणतालिकेतील तळ राखून ठेवता अाला.
जयपूरचा विजयी षटकार : नवनीत गाैतमच्या नेतृत्वात जयपूर पिंक पँथर्सने गुरुवारी कबड्डी लीगमध्ये विजयी षटकार मारला. या टीमने लढतीत बंगळुरू बुल्सविरुद्ध २७-२५ अशा फरकाने राेमहर्षक विजय मिळवला. या विजयासह जयपूरने गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले. या टीमचे १२ सामन्यांत सहा विजयासह एकूण ३६ गुण झाले. दुसरीकडे बंगळुरू टीम ३३ गुणांसह गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर अाहे.

बंगळुरू-दिल्ली
अापल्या घरच्या मैदानावर यजमान बंगळुरू बुल्सला शुक्रवारी दबंग दिल्लीच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. दाेन्ही संघ विजयी ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्नशील अाहेत. त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार हाेण्याची शक्यता अाहे. मुंबाविरुद्ध सामन्यातील पराभवातून सावरलेला बंगळुरू संघ नव्या दमाने मैदानावर उतरणार अाहे. बंगाल वाॅरियर्स अाणि पाटणा पायरेट्स हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. बंगाल लीगमध्ये सध्या फाॅर्मात अाहे.