आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईशान ‘ला लीगा’ क्लबकडून खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारताचा १८ वर्षीय फुटबॉलपटू ईशान पंडित स्पॅनिश ला लीगाकडून करारबद्ध झालेला पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. त्याला ला लीगाच्या सीडी लेगानेसने करारबद्ध केले. सध्या लेगानास ला लीगामध्ये अकराव्या स्थानावर आहे. लेगानासने ३ सामने जिंकले आणि तीन सामने गमावलेसुद्धा.

डिव्हिजन ऑन डी जुवेनाईलमध्ये खेळणाऱ्या अंडर १९ संघाचा ईशान सदस्य होता. अंडर १९ खेळाडूंचे हे टॉप डिव्हिजन आहे. ईशान आता बार्सिलोना, रिअल माद्रिदविरुद्ध खेळताना ईशान दिसेल.

आपल्या निवडीबाबत ईशान म्हणाला, ‘मी याआधी गेटाफेच्या ज्युनियर संघासाठी ट्रायल दिले होती. मात्र, ती टीम रेलिगेट झाल्याने काम बिघडले. मला ला लीगामध्ये खेळायचे होते. मी त्यांच्या ट्रायलमध्ये पास झालो होतो. मात्र, त्याच्यासोबत करारबद्ध होण्यास अर्थ नव्हता. मला नियमित संघाकडून खेळायचे होते. या सत्राच्या अखेरपर्यंत मला सीनियर संघात स्थान मिळवायचे आहे. हेच सध्या माझे लक्ष्य आहे. मी मैदानावर मेहनत घेऊन माझे स्वप्न साकार करेल.’
बातम्या आणखी आहेत...