आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha And Prakash Jha Show At Airtel Delhi Half Marathon

स्पोर्टी लुकमध्ये अशी दिसली बिपाशा, दिल्ली मॅराथनमध्ये झाला हा नवीन विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड अॅक्ट्रेस बिपाशा बसु. - Divya Marathi
बॉलीवुड अॅक्ट्रेस बिपाशा बसु.
नवी दिल्ली- राजधानी दिल्ली येथे रविवारी एयरटेल दिल्ली हाफ मॅराथॉन (एडीएचएम) 2015 मध्ये बॉलीवुड अॅक्ट्रेस बिपाशा बसू स्पोर्टी लुकमध्ये दिसून आली. या इव्हेंटमध्ये तिच्या शिवाय दिग्दर्शक प्रकाश झादेखील दिसून आले. दिल्ली हाफ मॅराथनने सर्वाधिक गर्दी जमवण्याचा विक्रम केला आहे. या वेळी 34 हजारहून अधिक लोक या इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. या आधी 32 हजार लोकांनी भाग घेतल्याचा विक्रम होता.
बिपाशाने दिल्या फिटनेस टिप्स
बॉलीवुडमध्ये फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी बिपाशा आणि निर्देशक प्रकाश झा यांनी लोकांमध्ये स्वास्थ्य जागरूती केली. या वेळी बिपाशा म्हणाली का, मला आनंद वाटतो की या इव्हेंटमध्ये महिलांनीही मोठा सहभाग घेतला होता. बिपाशा ब्लॅक अपर आणि लोअरमध्ये स्पोर्टी दिसत होती.
हे ठरले चॅम्पियन
इथियोपियाचा बिरहानु लेगेसे आणि केन्याची सिंथिया लिमो यांनी दिल्ली हॉफ मॅराथनमध्ये प्रत्येकी पुरुष आणि महिला गटात प्रथम स्थान मिळवले. लेगेसेने 59.20 मिनिटात पहिला क्रमांक पटकावला. तर हमवतन मोसिनेट गेरेम्व्यबने दुसरा क्रमांक मिळवला. इरिट्रियाचा विक्रमवीर जेरसेनाथ टाडेसे (59.24 मिनट) तिसरा क्रमांक मिळवला. महिला गटात सिंथियाने एक तास आठ मिनिट 35 सेकंदात शर्यत संपवत प्रथम क्रमांक मिळवला. 2014 जागतिक मॅराथन चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक मिळवलेल्या किपरोपने दुसरा क्रमांक मिळवला तर ग्लेडीस चेसिरने तिसरा क्रमांक मिळवला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हेटमध्ये भाग घेतलेल्या बिपाशा बसु चे PHOTOS...