आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंनंतर चिअरलीडर्सही कृष्णवर्णीयांच्या समर्थनात; गुडघ्यावर बसून केला विरोध !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांसोबत असलेल्या भेदभावामुळे रस्त्यांवर प्रदर्शन हाेत आहे. आता हा विरोध खेळाच्या मैदानापर्यंत पोहोचला आहे. अनेक खेळाडूंनी सामन्याच्या आधी अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू असताना गुडघ्यावर बसून विरोध दर्शवला. यात चिअरलीडर्सही सामील झाल्या आहेत. हार्वर्ड विद्यापीठात फुटबॉल सामन्यापूर्वी, राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा चिअरलीडर्स गुडघ्यावर बसल्या. दुसरीकडे नॅशनल फुटबॉल लीग टीम सॅन फ्रान्सिस्कोचा खेळाडू कोलिन काएपरनिकला, तर असे केल्यामुळे जिवे मारण्याची धमकी मिळाली.
मुळात अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक लोकांसोबत भेदभाव वाढत आहे. येथे वर्णभेदावरून असमानता वाढत आहे. या लोकांना पोलिसांकडूनही वाईट वागणूक मिळत आहे. कोलिन म्हणाला, “एकेदिवशी माझ्यासोबत एका पोलिसाने कृष्णवर्णीय व्यक्तीला वाईट वागणूक दिली. मी त्या पोलिसाला रोखले तर त्याने मलासुद्धा धमकावले. मी या घटनेचा सार्वजनिक पातळीवर विरोध करण्यास सुरुवात केली. आता मी राष्ट्रगीताच्या आधी गुडघ्यावर बसून माझा विरोध दर्शवतो. मला बऱ्याच सहकारी खेळाडूंचे समर्थन मिळाले आहे. मी असे करत असल्याने माझ्यावर टीकासुद्धा होत आहे. मला जिवे मारण्याची धमकीसुद्धा मिळाली आहे.’ अमेरिकेत राष्ट्रपतिपदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलिन याच्यावर टीका केली आहे. ट्रम्प म्हणाले, “कोलिनने अमेरिकेला सोडले पाहिजे आणि असा देश शोधला पाहिजे, जेथे त्याच्यासाठी चांगले काम होत असेल.’
वर्णभेद, जातिभेदाच्या विरोधात चिअरलीडर्सही मैदानात उतरल्या आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये िचअरलीडर्स गुडघ्यावर बसल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...