आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:दारू, ड्रग्सने 24 तास नशेत राहायची, 'पार्टी गर्ल' अशी बनली बॉडी बिल्डर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडी बिल्डर निलपर्ना सेन. - Divya Marathi
बॉडी बिल्डर निलपर्ना सेन.
स्पोर्ट्स डेस्क- माईक टायसन, लायला अली, रॅंडी ऑर्टन आदी. हे सर्व स्पोर्ट्स स्टार्स आहेत. ज्यांचा भूतकाळ एक तर गुन्हेगारीशी संबंधित होता किंवा ते या व्यावसायाशी कधी फिट बसले नाहीत. मात्र जेव्हा त्यांना त्यांच्यातील गुणवत्तेचा अंदाज आला तेव्हा टॉपवर गेले. अशीच काहीशी कहाणी गुजरातची बॉडी बिल्डर निलपर्ना सेनची आहे. कधी काळी ती पबमध्ये जायची, पार्टी करायची व 24 तास नशेत राहायची. दारू, सिगरेट आणि ड्रग्स तर तिचे जीव की प्राणच होते पण ती आता एक बॉडी बिल्डर आहे. तसेच एक कोच म्हणून काम पाहत आहे. असा आहे तिचा भूतकाळ....
 
- 24 वर्षाची निलपर्ना सेनने सांगते की, माझा जन्म सूरतमध्ये झाला. मला मुंबई जाऊन एमबीए करायचे होते. 
- त्यावेळी मी सूरतमधील ज्वेलरी ब्रॅंडसाठी मार्केटिंगचे काम पाहायचे. तेथे गुलामांप्रमाणे काम होते. 
- मला जाणवले की मला जे करायचे आहे ते इथे नाही. तरीही काही काळ मला काम करावे लागले.
 
दारू- ड्रग्समध्ये शोधू लागले आनंद-
 
- तिने सांगितले, निरस जीवनात मी आनंद मिळविण्यासाठी स्मोकिंग, ड्रग्स आणि दारू घेऊ लागली. 
- मी नेहमीच पार्टीत जायचे. तेथेच मी दारू, सिगरेट आणि ड्रग्स घेऊ लागली. मी नशेत राहू लागले.
- एक दिवस असाही आला की मला त्याचा कंटाळा आला व आपण चुकीच्या बाबीत अडकत चालल्याची जाणीव झाली.
- यातून बाहेर येण्यासाठी मी जिम ज्वाईन करण्याचा निर्णय घेतला.
 
जीवन बदलले, बनली बॉडी बिल्डर-
 
- त्यावेळी निलपर्ना एब्स बनवू इच्छित होती. तिला काही दिवसात शरीरावर सकारात्मक बदल दिसू लागला. 
- मग तिच्या लक्षात आले की, अरे हेच तर खरे जीवन आहे. यानंतर तिने ड्रग्स, दारू आणि सिगरेट सोडून दिले. 
- तिने ट्रेनिंग आणि न्यूट्रिशनचा कोर्स करीत सूरतमध्ये फिटनेस सेंटरमध्ये कोच म्हणून काम करणे सुरु केले आहे.
 
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, महिला बॉडी बिल्डर निलपर्ना सेनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...