आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोपन्ना-मेर्जिया जोडी क्वार्टर फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाले-स्टुटगार्ट ओपन टेनिस स्पर्धेत किताब जिंकल्यानंतर भारताच्या रोहन बाेपन्ना व रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जिया आणखी एका विजेतेपदाकडे आगेकूच करत आहेत. या जोडीने आपला शानदार फाॅर्म कायम ठेवत गॅरी वेबर आेपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

दुसऱ्या मानांकित जोडीने झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोल व सर्जेई स्टाकोवस्की या जोडीला २-६, ६-३, १०-८ ने पराभूत केले. भारत व रोमानियाच्या जोडीची सुरुवात खराब झाली आणि प्रतिस्पर्धी जोडीने ब्रेक गुणांत पहिला सेट ६-२ ने एकतर्फी जिंकला. दुसऱ्या फेरीत बोपन्ना-मेर्जियाने खेळ उंचावत दुसरा सेट जिंकत लढत १-१ ने बरोबरीत आणली. निर्णायक सेटच्या सुपरटायब्रेकरमध्ये भारत-रोमानिया जोडीने १०-८ ने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.