आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेपन्ना-मर्जियाचा विजय ! तर नोवाक याेकाेविकची निशिकाेरीवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या माइक - बाॅब ब्रायनविरुद्ध  सामन्यादरम्यान सर्व्हिस करताना राेमानियाचा फ्लाेरिन मर्जिया व भारताचा राेहन बाेपन्ना. - Divya Marathi
अमेरिकेच्या माइक - बाॅब ब्रायनविरुद्ध सामन्यादरम्यान सर्व्हिस करताना राेमानियाचा फ्लाेरिन मर्जिया व भारताचा राेहन बाेपन्ना.
लंडन- भारताचा अाघाडीचा टेनिसपटू राेहन बाेपन्नाने दुहेरीचा अापला सहकारी फ्लाेरिन मर्जियासाेबत साेमवारी एटीपी टूर फायनल्समध्ये सनसनाटी विजयाची नाेंद केली. या जाेडीने पुरुष दुहेरीतील जगातील नंबर वन माइक व बाॅब या ब्रायन बंधूंना सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. यासह त्यांनी स्पर्धेतील अापल्या माेहिमेचा दमदार शुभारंभ केला.
इंडाे-राेमानियन जाेडी राेहन बाेपन्ना अाणि फ्लाेरिन मर्जियाने ६-४, ६-३ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. जगभरातील अव्वल अाठ दुहेरीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले अाहेत. राउंड राॅबिनमध्ये बाेपन्ना- मर्जियाने अापला पहिला सामना जिंकला. अाता या जाेडीचा पुढील फेरीतील सामना इंग्लंडचा जेमी मरे अाणि अाॅस्ट्रेलियाच्या जाॅन पियर्सशी हाेईल.
अाठव्या मानांकित बाेपन्ना अाणि मर्जियाने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये अाक्रमक सर्व्हिस केली. त्यामुळे या जाेडीला काेर्टवर अापला दबदबा निर्माण करता अाला.या वेळी अव्वल मानांकित ब्रायन बंधुंनी दमदार पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, हे दाेन्ही अव्वल खेळाडू सपशेल अपयशी ठरले. याचाच फायदा घेत बाेपन्ना अाणि मर्जियाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारून लढतीमध्ये अाघाडी मिळवली.

त्यानंतर या जाेडीने अापली अाक्रमक खेळीची लय दुसऱ्या सेटमध्येही कायम ठेवली. त्यामुळे अमेरिकेच्या माइक अाणि बाॅब या दाेन्ही अव्वल खेळाडूंना समाधानकारक खेळी करता अाली नाही. सरस खेळी करून अाठव्या मानांकित जाेडीने दुसरा सेट सहज जिंकून सामना अापल्या नावे केला. जगातील अव्वल अाठ जाेड्यांमध्ये बाेपन्ना अाणि मर्जियाला शेवटच्या क्षणी पात्रता पूर्ण करता अाली. त्यामुळे ही जाेडी अाठव्या स्थानावरून स्पर्धेत सहभागी झाली.

दुसऱ्यांदा ब्रायन बंधूंना हरवले
भारताचा राेहन बाेपन्ना अाणि राेमानियाच्या फ्लाेरिन मर्जियाने सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या ब्रायन बंधूंना पराभूत केले. यापूर्वी या जाेडीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात ब्रायन बंधूंना धूळ चारली हाेती. यासह बाेपन्ना अाणि मर्जियाने अापली लय कायम ठेवली. अातापर्यंत पुरुष दुहेरीच्या चार सामन्यांमध्ये या दाेन्ही जाेड्या समाेरासमाेर अाल्या. यामध्ये दाेन वेळा अमेरिकेच्या जाेडीने विजय मिळवला.