आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जसप्रीत बुमराहचे 75 टक्के बळी वरच्या फळीचे, आयपीएलमध्ये मलिंगाला टाकले मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल २०१७ चा ३५ वा सामना. मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्समधील लढत अनिर्णीत झाली होती. सुपर ओव्हरमध्ये आधी खेळून मुंबईने ११ धावा केल्या होत्या. गुजरातसाठी ब्रँडन मॅक्कुलम आणि अॅरन फिंच मैदानात उतरले. मुंबईसाठी हे षटक लसिथ मलिंगा टाकेल, अशी अपेक्षा होती, पण कर्णधार रोहित शर्माने चेंडू जसप्रीत बुमराहकडे सोपवला आणि त्याने फक्त ६ धावा देऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बुमराह आता मलिंगापेक्षा पुढे निघून गेला आहे, असे वाटावे अशा अनेक घटना या वर्षी आयपीएलमध्ये घडल्या.

दोघांनाही त्यांची गोलंदाजीची विशिष्ट अॅक्शन आणि स्लॉग ओव्हर्समध्ये यॉर्करसाठी ओळखले जाते. कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या मलिंगाचे यॉर्कर आणि स्लोअर डिलिव्हरी आता फलंदाजांसाठी तेवढे धोकादायक राहिलेले नाहीत. त्यात बुमराह आता त्याच्या पुढे निघाला आहे.

माजी क्रिकेटपटू मदन लाल म्हणाले की, बुमराह संघासाठी कठीण समजली जाणारी षटके टाकतो. आयपीएलमध्ये या वर्षी त्याने डेथ ओव्हर्समध्ये १६४ चेंडू टाकले, कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त. आधी ही जबाबदारी मलिंगाची असायची. पण यंदा तो संघासाठी सर्व सामने खेळू शकला नाही. २० बळींसह बुमराह सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी राहिला, तर मलिंगाच्या खात्यात ११ च बळी होते.

सरासरी आणि धावा देण्यातही बुमराह त्याच्यापेक्षा पुढे राहिला. मलिंगाने बुमराहच्या तुलनेत प्रत्येक बळीसाठी सुमारे ७ चेंडू जास्त घेतले आणि प्रति षटकात १.११ धावा जास्त दिल्या. क्रिकेट तज्ज्ञ अयाज मेमन म्हणाले की, बुमराहचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वैविध्य. त्याला तो घाबरत नाही. त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे आणि तो १४० किमी प्रति तासापेक्षा जास्त वेगानेही गोलंदाजी करतो. आयपीएलच्या या परफॉर्मन्सनंतर जर चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो जगातील वरिष्ठ फळीतील वेगवान गोलंदाजांत समाविष्ट होऊ शकतो. गुजरात लायन्सच्या विरोधात सुपर ओव्हरमध्येच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत अनेकदा बुमराहची गोलंदाजी निर्णायक ठरली. मात्र, निर्णायक वेळी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या बुमराहला फक्त एकदाच ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला.

बुमराहने १० बळी स्लॉग ओव्हर्समध्ये घेतले, मलिंगाच्या नावे फक्त २ बळी
अंतिम षटकांत बुमराह विश्वसनीय गोलंदाज आहे. त्याने यंदा ५०% बळी याच षटकांत घेतले. त्याचे २० पैकी १० बळी अंतिम चार षटकांत आले. मलिंगाचे ११ पैकी २ बळी स्लॉग ओव्हर्समध्ये. बुमराहच्या बळींमध्ये ७५% वरच्या फळीतील फलंदाज होते. मलिंगाचे ११ पैकी ७ बळी वरच्या फळीतील फलंदाज.
 
बातम्या आणखी आहेत...