आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boxer Manny Pacquiao's Anti gay Comments Draw Ire

समलैंगिकांना म्हटले, "पशूपेक्षा अधिक तुच्छ'; वादात अडकला स्टार बॉक्सर मॅनी पॅकियाओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला आणि एकमेव "एट डिव्हिजन वर्ल्ड चॅम्पियन' मॅनी पॅकियोआने वयाच्या अवघ्या ३७ वर्षी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. यामुळे फिलिपाइन्सचा हा बॉक्सर चाहत्यांत "द पीपल्स चॅम्पियन' नावाने सुप्रसिद्ध आहे. तो आपल्या देशाच्या विकासासाठी राजकारणात सक्रिय आहे. त्याने वयाच्या ३२ वर्षी निवडणूक लढली अाणि फिलिपाइन्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडूणन आला. तो या वर्षी सिनेट उमेदवार म्हणून लढत आहे.

समलैंगिकांवर वादग्रस्त विधान केल्याने सध्या तो चर्चेत आहे. त्याने समलैंगिकांना "पशूपेक्षा तुच्छ' म्हणून वादाला जन्म दिला आहे. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. या विधानानंतर नाइकीने तर त्याच्यासोबतचा करार संपुष्टात आणला. पॅकियाओची फॅन असलेली रोंडो राउसीनेसुद्धा त्याच्या या विधानावर टीका केली. यानंतर पॅकियाओने माफी मागितली. २००० मध्ये "फायटर ऑफ द डिकेट' म्हणून निवडण्यात आलेला पॅकियाओ बॉक्सिंगशिवाय बास्केटबॉलही खेळत होता. त्याला अिभनय आणि गाण्याचाही छंद आहे. पॅकियाओने ११ टी.व्ही. शो आणि ९ चित्रपटात अभिनय केले आहे.

एिशयन फायटर ऑफ ऑल टाइम
पुरस्कार
१० वर्ल्ड किताब जिंकले अातापर्यंत
करिअर रेकाॅर्ड
त्याच्या जिंकण्याचा रेकाॅर्ड ६५-५७ असा अाहे
फोर्ब्जच्या नजरेत
२०१५ मध्ये सर्वाधिक महागडा दुसरा खेळाडू
बेस्ट फायटर
२००६, ०८, ०९ मध्ये बेस्ट फायटर पुरस्कार