आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boxer Vijender Singh & Model Susheel Jangira Pictures From Beach Cafe

PHOTOS : ग्लॅमरस फोटो शूटमुळे चर्चेत आला होता हा Boxer

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने इंडियन बॉक्सिंगचा निरोप घेत प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे भारतीय बॉक्सिंग संघटना नाराज आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यामुळे रिओ ऑलिम्पिक-2016 मध्ये भारताची पदकांची दावेदारी कमी होऊ शकते. सध्या हरियाणामध्ये DSP पदावर असलेल्या विजेंदरने 2008 मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते.

विजेंदरने ऑलिम्पिक पदकाबरोबरच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेतही पदक मिळवून देशाचा गौरव वाढवला आहे. बॉक्सिंगबरोबरच 2011 मध्ये मॉडेल सुशील जंगिराबरोबर 'बीच कॉफी'च्या जाहिरातीसाठी केलेल्या ग्लॅमरस फोटो शूटमुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता.

जिंकल्यास 20 ते 25 कोटींची कमाई
प्रो बॉक्सिंगमध्ये एखादे विजेतेपद पटकावल्यास विजेंदरला मिळणारी रक्कम 20 ते 25 कोटींपर्यंत असू शकते. त्यात क्वीन्सबरी आणि आयओसीचाही वाटा असेल. या दोन्ही विजेंदरच्या प्रमोटर कंपनी आहेत. यादरम्यान, त्याच्या प्रशिक्षणाचा खर्च प्रमोटर कंपनी IOC उचलणार आहे. विजेंदरची सध्याची वार्षिक कमाई सुमारे 30 ते 40 लाखापर्यंत आहे. त्याशिवाय त्याने नुकताच एमटीवी रोडीज शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच 'फगली' नावाच्या चित्रपटात अभिनयही केला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग आणि बॉक्सिंमध्ये मिळणारी बक्षिसाची रक्कम यातूनही त्याला काही उत्पन्न मिळते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विजेंदर आणि मॉडेल सुशील जंगिरा यांचे ग्लॅमरस फोटो...