आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग संघटना कात टाकण्यास सज्ज: कवळी, नव्याने ऊर्जा भरण्यास योजना कार्यान्वित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय मुष्टियोद्ध्यांनी ऑलिम्पिक पदकांपर्यंत मजल मारली. लंडन, रिओ ऑलिम्पिकला अधिक पदकांची स्वप्ने दाखविली. भारतीय ऑलिम्पिक महासंघ आणि क्रीडा खाते यांच्यातील राजकारणाचा ‘ठोसा’ स्वत: मुष्टियोद्ध्यांनाच बसला आणि पदके दूरच राहिली, खेळाचे खेळाडूंचे अस्तित्वच नष्ट झाले. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने निवडणुका घ्यायला लावल्या. जय कवळी पुन्हा एकदा सरचिटणीस पदावर निवडून आले .

‘दिव्य मराठी’शी आपल्या नव्या योजनांबाबत बोलताना जय कवळी यांनी सांगितले, ‘बॉक्सिंगची गाडी रुळावरूनच घसरली होती. ती गाडी प्रथम रुळावर आणणे महत्त्वाचे आहे. गाडी रुळावर ठेवून मगच गाडीला पुढी वेगात नेता येईल. दोन टप्प्यांचे हे काम आहे. राज्य, राष्ट्रीय स्पर्धा पुन्हा सुरू करायच्या आहेत. लीग पुन्हा नव्याने पुनरुज्जीवित करायच्या आहेत. आता बॉक्सिंग कात टाकणार आहे.’

> गेली वर्षे फेडरेशनच अस्तित्वात नसल्यामुळे बेशिस्त वाढली आहे. त्यात सुधारणा करावी लागणार आहे. नव्या बाटलीत जुने रसायन, अशी परिस्थिती आहे.
> ज्यांनी माझ्यावर अविश्वास दाखविला त्यांनीच मला भरघोस मतांनी निवडून दिले. ६४ पैकी ४८ जणांनी मला पाठिंबा दिला. माझ्या कामामुळेच ते शक्य झाले. राजकारण त्यापाठी होते हे त्यामुळे सिद्ध झाले.
> गेली वर्षे नॅशनल कॅलेंडरच नव्हते. त्यामुळे बंद झालेल्या स्पर्धा सुरू करणे हे पहिले ध्येय असेल. त्यानंतरचा दुसरा टप्पा सुधारणांचा असेल. मार्चनंतर सुधारणांवर भर देणार आहोत.
> ‘स्पाइस जेट’चे प्रमुख अजय सिंग आमचे अध्यक्ष आहेत. ते आयआयटीयन्स आहेत. बंद पडलेली एअरलाइन्स त्यांनी पुन्हा सुरू केली आहे. आता जय-अजय यांची जोडी बंद पडलेली संघटनाही पुढे जोमात सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
> २०१७ मध्ये स्पर्धांचे मोठे, प्रचंड जाळे मी विणणार आहे. राज्य, जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिर यांचा समावेश त्यात असेलच.
> स्पर्धांबरोबरच खेळाडूंना, आर्थिक लाभ देणाऱ्या लीगही सुरू करणार आहे. ‘आयबा’ प्रोफेशनल बॉक्सिंग मी पुढील वर्षी भारतात आणणार आहे. त्याआधी यंदा भारताची स्वत:ची बॉक्सिंग लीग सुरू करणार आहे. संघटनेची इंटरस्कूल लीग सुरू करणार आहे. प्रो बॉक्सिंग बॉक्सिंग लीग नव्याने सुरू होतील.
> महिलांचीही बॉक्सिंग लीग आम्ही सुरू करत आहोत. एकूण आठ संघांमध्ये ही लीग घेण्यात येणार आहे. त्यासाठी आठ शहरांचे संघ निर्माण केले जातील. भारतात महिला मुष्टियोद्ध्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महिलांच्या या लीगलाही प्रचंड प्रतिसाद अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...