आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्राझीलची धडाकेबाज विजयाने सुरुवात; ब्राझीलच्या वेल्सिचा स्पेनसाठी अात्मघाती गाेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेची- तीन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ब्राझील युवा टीमने शनिवारी फिफाच्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. ब्राझीलने ड गटातील अापल्या सलामीच्या सामन्यात तीन वेळच्या उपविजेत्या स्पेनचा पराभव केला. दुसरीकडे जर्मनी संघाने क गटात अापला पहिला सामना जिंकला. यासह जर्मनीने या गटात विजयाचे खाते उघडले. जर्मनीने लढतीत काेस्टारिकावर मात केली.  तसेच इराणने गुनियावर ३-१ ने विजय मिळवला. त्यापाठाेपाठ नवख्या टीम नाइजरने लढतीत उत्तर काेरियाला १- ० ने पराभूत केले. 

ब्राझीलच्या युवा टीमने २-१ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. लिनकाेल्न (२६ वा मि.) अाणि पाऊलिन्हाे (४५+१ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून ब्राझीलला विजय मिळवून दिल. स्पेनसाठी ब्राझीलच्या वेल्सीने (५ वा मि.) सामन्यात अात्मघाी गाेल केला. मात्र, इतर खेळाडूंच्या अपयशाने स्पेनला पराभवाला सामाेरे जावे लागले. या टीमचा बराेबरी साधण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. स्पेनला दुसऱ्या सामन्यात विजयी ट्रॅकवर येण्याची संधी अाहे. स्पेनचा दुसरा सामना मंगळवारी नवख्या नाइजर टीमशी हाेईल. 
 
पाऊलिन्हाेने निश्चित केला विजय 
स्पेनने चांगली सुरुवात करत पाचव्या मिनिटाला अाघाडी घेतली. त्यामुळे  ब्राझीलने बराेबरीसाठी शर्थीची झुंज दिली.  २१ मिनिटांनी ब्राझीलचा प्रयत्न यशस्वी झाला. लिनकाेल्नने  ब्राझीलला बराेबरी मिळवून दिली. त्यानंतर २० मिनिटांत पाऊलिन्हाेने ब्राझीलचा विजय निश्चित केला.   

ब्राझीलचा सामना काेरियाशी
वर्ल्डकपमध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या ब्राझीलचा स्पर्धेतील दुसरा सामना मंगळवारी दक्षिण काेरियाशी हाेईल. या सामन्यातही बाजी मारून अापली लय कायम ठेवण्याचा ब्राझीलचा प्रयत्न असेल. याशिवाय ब्राझीलला गुणतालिकेतील अापले अव्वल स्थानही मजबूत करता येईल.

अवुकुच्या गाेलने जर्मनी संघ विजयी
अवुकुच्या गाेलने जर्मनीची विजयी सलामी : दहाव्यांदा वर्ल्डकपमध्ये नशीब अाजमावणाऱ्या जर्मनीने दमदार सुरुवात केली. शेवटच्या मिनिटांत अवुकुने (८९ वा मि.) शानदार गाेल करून जर्मनीचा विजय निश्चित केला. या गाेलच्या बळावर जर्मनीने पहिल्या सामन्यात काेस्टारिकाचा पराभव केला. जर्मनीच्या युवांनी २-१ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. अाप्राे (२१ वा मि.) यानेही जर्मनीच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. काेस्टारियाकडून गाेमेझने ८४ व्या मिनिटाला एकमेव गाेल केला.मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. यामुळे काेस्टारियाला पराभवाला सामाेरे जावे लागले. अाता जर्मनीचा दुसरा सामना इराणशी हाेईल. हे दाेन्ही संघ मंगळवारी गाेव्याच्या मैदानावर समाेरासमाेर असतील. या सामन्यात बाजी मारून अापले अव्वल स्थान मजबूत करण्याचा जर्मनीचा मानस अाहे. यंदा वर्ल्डकपची फायनल गाठण्याच्या इराद्याने जर्मनीचा युवा संघ खेळत अाहे.
 
कॅलेडाेनियाचे अाज पदार्पण
यंदा प्रथमच फिफाच्या वर्ल्डकपमध्ये न्यू कॅलेडाेनियाचा युवा संघ सहभागी झाला अाहे. त्यामुळे अापल्या दमदार पदार्पणाकडे या टीमच्या युवांची नजर लागली अाहे. मात्र यासाठी या टीमला अापल्या सलामी सामन्यात खडतर अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. कॅलेडाेनियासमाेर रविवारी फ्रान्सचे अाव्हान असेल. हे दाेन्ही संघ गुवाहाटीच्या मैदानावर समाेरासमाेर असतील.

मेक्सिकाेसमाेर इराकचे अाव्हान 
दाेन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मेक्सिकाेची वर्ल्डकपमधील दमदार सुरुवात करण्याची वाट काहीशी खडतर मानली जाते. कारण या टीमच्या समाेर अाशियाई चॅम्पियन इराकचे तगडे अाव्हान असेल. त्यामुळे फ गटात हा काेलकात्याच्या मैदानावर सामना अधिक राेमांचक हाेण्याचे चित्र अाहे. मेक्सिकाेने विजयी सलामीने स्पर्धेत चांगली सुरुवात करण्याचा मानस व्यक्त केला अाहे.

इंग्लंडसमाेर चिलीचा तडका!  
इंग्लंडच्या युवांना काेलकात्याच्या मैदानावर चिली तडक्याचा ठसका साेसावा लागणार अाहे. हे दाेन्ही संघ रविवारी विजयी सलामीसाठी झंुजणार अाहेत. इंग्लंडने कसून सराव करताना विजयाचे संकेत दिले. मात्र, चिलीनेही विजयासाठी कंबर कसलेली अाहे. यातून हा सामना अधिक रंगतदार हाेण्याची शक्यता अाहे. चिलीने १९९३ च्या वर्ल्डकपमध्ये तिसरे स्थान गाठले हाेते.
बातम्या आणखी आहेत...