आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Break Point Maria Sharapova Splits With Fellow Tennis Star Boyfriend Grigor

PHOTOS: शारापोवाचे पाचव्‍यांदा ब्रेकअप, सेरेनाच्‍या EX बॉयफ्रेंडलाही सोडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच ग्रॅड स्लॅम पदकं पटकवणारी रशियन टेनिसस्‍टार मारिया शारापोवा हिचे आपला बॉयफ्रेंड टेनिस खेळाडू ग्रिगोर दिमित्रोव याच्‍याशी ब्रेकअप झाले आहे. मागील तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्‍ये होते. सोळाव्‍या क्रमांकाचा खेळाडू दिमित्रोव याने शुक्रवारी या बाबीचा खुलासा केला.

दिमित्रोवचे शारापोवाच्‍या आधी नंबर वर टेनिसस्‍टार सेरेना विल्‍यम्‍ससोबतही अफेयर होते.
शारापोवाच्‍या ब्रेकअपची मागील दहा वर्षातील ही पाचवी घटना आहे. याआधी गायक अॅडम लिवाईन, टेनिसपटू एंडी रॉडिक, निर्माता चार्ली एबरसोल आणि बास्केटबॉल खेळाडू साशा वुजासिक यांच्‍याशी तिचा संबंध होता. साशा वुजासिक सोबत तर तिचा साखरपूडाही झाला होता.
दिमित्रोव काय म्‍हणतो?
दिमित्रोव याने बल्‍गेरियन मिडीयाला सांगितले की, " माझे आणि शारापोवाचे संबंध तुटले आहेत. आम्‍ही एकमेकांसोबत खुप आनंदात जगलो. तिने तिचा खेळ आणि खाजगी जिवनात प्रगती करावी यासाठी मी मनोकामना करत आहे. आता मी पण माझ्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.''
दिमित्रोवमुळेच सेरेना-शारापोवाचे पटत नव्‍हते
मारिया आणि सेरेना या दोघींमध्‍ये दिमित्रोवमुळेच छत्‍तीसचा आकडा होता. सेरेनाने ग्रिगोर दिमित्रोवबद्दल 'काळ्या काळजाचा' अशी टिप्‍पणी केली होती. शारापोवाने सेरेनाचा दुसरा बॉयफ्रेंड पॅट्रिक मोर्टोग्लूच्‍या बाबतीतही असभ्‍य टिप्‍पण्‍या केल्‍या होत्‍या. या संबंधांमध्‍ये सेरेनाही मागे हटणारी नव्‍हती. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी या दोघींचा वाद चव्‍हाट्यावर आला होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मारिया आणि दिमित्रोव यांचे डेटिंगदरम्‍यानचे फोटो..