आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Boxer Amir Khan's Help To Fan On Instafgram

बॉक्सर आमिर खाने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सला विचारले, कोणते बूट घालू?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉल्टन- एखाद्यासे लिब्रिटीने आपल्या चाहत्यांची मदत मागितल्याचे आपण कधी ऐकले आहे काय ? तेसुद्धा सोशल मीडियावर... विशेषत: आपल्या लूकसाठी. ब्रिटिश बॉक्सर आमिर खानने आपल्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सला बुटांची निवड करण्यासाठी मदत मागितली.

आमिर खानने इन्स्टाग्रामवर आपल्या पाच बुटांची जोडी पोस्ट केली. त्याने आपल्या ७.८० लाख फॉलोअर्सला विचारले की, सॉल अल्वारेजविरुद्ध फाइटसाठी मी कोणते बूट घालू? मेक्सिकोचा बॉक्सर अल्वारेजविरुद्ध त्याची फाइट मे रोजी लास वेगास येथे होणार आहे. हा सामना त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी झुंज मानली जात आहे. यासाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. तो रिंगमध्ये कठोर मेहनत घेत आहे. याशिवाय फाइटच्या वेळी त्याचे कोणते आऊटफिट असेल? कोणते बूट घालणार ? याची तयारी तो सोशल मीडियाच्या माध्यमाने करीत आहे. यासाठी त्याने विविध रंग आणि डिझाइन असलेल्या पाच बुटांच्या जोड्यांचा फोटो शेअर करून फॉलोअर्सला विचारले. अनेक फॉलोअर्सनी त्याला काळे बूट घालण्यास सांगितले, तर काहींनी त्याला गोल्डन ट्रीम असलेले पांढरे-पर्पल बूट चांगले असून तेच घातले पाहिजेत असे सांगत ते चांगले दिसतील, असेही सांगितले.

माजी वर्ल्ड चॅम्पियन आमिर लाइटवेट, लाइट-वेल्टरवेट आणि वेल्टरवेट गटात फाइट करतो. मात्र, अल्वारेजविरुद्ध तो डब्ल्यूबीसी मिडलवेट टायटल जिंकण्यास रिंगमध्ये लढेल. आमिर म्हणाला, वजनगट बदलल्यामुळे फार फरक पडणार नाही. मी या फाइटला माझ्या इतर सामन्यांप्रमाणेच बघताे आहे. आमिरला अल्वारेजकडून कठोर आव्हान मिळेल.

पुढील स्लाइडवर पाहा, बॉक्सर आमिर खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आपल्या बुटांचा फोटो...