आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Captain Of Team India Virat Kohli Said Nothing Changes In Our Head When We Face Pakistan

भारत-पाक क्रिकेट सामना केवळ एक मॅच; धोनी, युवराज सर्वात मजबूत आधारस्तंभ - विराट कोहली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंडमध्ये 1 जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आपला पहिला मॅच 4 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या निमित्त बुधवारी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना आपल्यासाठी केवळ एक मॅच असल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले. 
 
धोनी, युवराज सर्वात मजबूत आधार स्तंभ
- भारत आणि पाकिस्तानचा सामना क्रिकेटच्या चाहत्यांसाठी सर्वात रोमांचित सामना आहे यात शंका नाही. मात्र, आपल्यावर याचा मुळीच दबाव नाही असे विराट कोहलीने स्पष्ट केले.
- यासोबत. महेंद्र सिंह धोनी आणि युवराज सिंह भारतीय संघाचे सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेत असेही त्याने सांगितले.
- "भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळे, वेगळ्या तयारीची काहीही गरज मला वाटत नाही. पाकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत."
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकचे पारडे जड
- वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाक विरुद्ध रेकॉर्ड एकतर्फी 11-0 असा असला तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीत आकडे पाकिस्तानच्या दिशेने आहेत. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 3 सामने झाले आहेत. यापैकी केवळ एकच सामना भारताने जिंकला आहे. 
- चॅम्पियन्स ट्रॉफी 1 जूनुपासून सुरू होत आहे. यात पहिला सामना इंग्लंड आणि बांग्लादेशमध्ये रंगणार आहे. 2013 मध्ये झालेल्या मालिकेत भारताने फायनल्समध्ये इंग्लंडला 5 धावांनी पछाडले होते. 
- पाकिस्ताननंतर भारताचा दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध 8 जूनला होणार आहे. तर, 11 जून रोजी भारत दक्षिण अफ्रिकेशी भिडणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...