आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरीनच्या आईने सामान्य चाहत्यांप्रमाणे केली सायना-सिंधूची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- पी.व्ही. सिंधू व सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत २ पदके जिंकली. सिंधूने रौप्य, तर सायनाने कांस्य. दोघी बक्षीस घेऊन बाहेर आल्या तेव्हा फॅन झोनमध्ये अनेक चाहते सेल्फी, स्वाक्षरी घेण्यासाठी उभे होते. या गर्दीत ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरीनची आई टोनी मरीनदेखील उपस्थित होत्या. त्या सामान्य चाहत्यांप्रमाणे उभे राहून या दोघींची प्रतीक्षा करत होत्या. दोघांनी लगेच त्यांची भेट घेतली. टोनी यांनी दोघींना शुभेच्छा दिल्या व त्यांच्यासोबत आणि सायनाचे वडील हरवीर व सिंधूची आई पी. विजयलक्ष्मी सोबत सेल्फी घेतली.

सोबत दिसले सायना-सिंधू-गोपीचंद
रविवारी सिंधूचा अंतिम सामना सायनाने रेलिंगजवळ उभे राहून पाहिला. सामना संपताच सायना गोपीचंदजवळ गेली आणि ‘माझे पेट्रोल संपले, पाहता पाहता’ असे त्यांना म्हणाली. ‘ सामना कोणत्या ना कोणत्या वळणावर संपणारच होता. हे नेहमीसाठी चालू राहू शकत नाही, ’ असे गमतीने गोपीचंद यांनी तिला म्हटले. त्यानंतर तिघेही प्रेक्षकांसोबत छायाचित्रे घेण्यासाठी सहभागी झाले.
बातम्या आणखी आहेत...