आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अाणि चमकले कॅवेलियर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅकलंड (अमेरिका) - क्लीव्हलँड कॅवेलियर्सने अातापर्यंत एनबीएचे विजेतेपद जिंकले नव्हते. दुसरीकडे गाेल्डन स्टेट वाॅरियर्स ४० वर्षांनंतर फायनलमध्ये दाखल झाली अाहे. कसर काेणीही साेडू इच्छित नाही. त्यामुळेच तर सामने अधिक राेमांचक हाेत अाहेत. अाेरेकल एरियामध्ये संडे इव्हिनिंगच्या या सामन्यात कॅवेलियर्सने वाॅरियर्सला अतिरिक्त वेळेत ९५-९३ ने पराभूत करून बेस्ट अाॅफ सेव्हन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली अाहे. १९ हजारांपेक्षा अधिक चाहत्यांचा पाठिंबा अापल्या टीम वॉरियर्सला हाेता. मात्र, लेबरन जेम्सच्या (३९) शानदार कामगिरीच्या बळावर टीमने वाॅरियर्सला पराभूत केले. फायनल्सचा पहिला सामना वाॅरियर्सने जिंकला हाेता. पाच वेळ फायनल खेळत असलेला जेम्स वन मॅन अार्मीसारखा लढत हाेता. त्याने १६ रिबाउंड अाणि ११ अस्टिटसह संघाच्या विजयात माेलाची भूमिका बजावली. असे एनबीए इतिहासात पहिल्यांदाच घडले.

अतिरिक्त वेळेत निर्णय
चाैथ्या क्वार्टरनंतर दाेन्ही टीम ८७-८७ ने बराेबरीत हाेत्या. त्यामुळे सामन्याचा निर्णय हा अतिरिक्त वेळेत लागला. बास्केटबाॅलमध्ये अतिरिक्त वेळेला अाेव्हरटाइम असे म्हणतात. हा अाेव्हरटाइम कॅवेलियर्स टीमसाठी फायदेशीर ठरला व टीमने ७ चा स्काेअर करून विजय मिळवला. वाॅरियर्सने प्रयत्न केले. मात्र, स्टीफन ऐनवेळी अपयशी ठरला.

ड्रेसिंग रूममध्ये मीडिया
एनबीए हा एकमात्र खेळ अाहे, जेथे मीडियाला त्यांच्या क्लाॅक रूमपर्यंत जाण्याची परवानगी असते. एनबीएमध्ये या ड्रेसिंग रूमच्या जागी क्लाॅक रूम असे म्हटले जाते. सामन्यानंतर वाॅरियर्स व कॅवेलियर्सच्या क्लाॅक रूममध्ये खेळाडूंच्या मुलाखती घेण्यासाठी मीडियाची प्रचंड गर्दी हाेते. काही खेळाडू अंघाेळीच्या तयारीत हाेते तर काहींनी मुलाखत दिली.
वाॅरियर्सला घरच्या मैदानावर हरवून कॅवेलियर्सची बराेबरी
क्लीव्हलँडच्या कॅवेलियर्सने शेवटी दुसऱ्या फायनलमध्ये विजय मिळवला. या टीमचा पहिल्या सामन्यात पराभव झाला हाेता. गाेल्डन स्टेट वाॅिरयर्सला कॅवेलियर्सने अतिरिक्त वेळेत ९५-९३ ने नमवून मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. अाता फायनल मंगळवारी अाहे.

एनबीएमध्ये फसले तर गेम अाहे
जय-पराजयाला फारशी किंमत नसल्यानेच तर ४०० ते ३६०० डाॅलरपर्यंतचे महागडे तिकीटदेखील चाहत्यांसमाेर फिके पडते. एनबीए फायनल्ससाठी अमेरिकन चाहत्यांच्या जल्लाेषाला सलाम करावा लागेल. राहिलेली कसर वाॅरियर्स टीम मॅनेजमेंटने पूर्ण केली. हे चाहते त्यांच्यासाठी कदाचित देवच अाहे. १९ हजारपेक्षा अधिक अासनक्षमता अाणि प्रत्येक सीटवर गाेल्डन स्टेट वाॅरियर्सची येलाे कलरचे टी शर्ट ठेवण्यात अाले हाेते. एनबीए फायनलमध्ये वाॅरियर्स ४० वर्षांनंतर दाखल झाला हाेता अाणि घरच्या मैदानावर वाॅरियर्स टीम मॅनेजमेंटने अापल्या चाहत्यांसाठी येलाे कलरच्या टी शर्टचा वर्षाव केला हाेता. या सामन्यात वाॅरियर्सचा पराभव झाला असला तरी सॅनफ्रान्सिस्काेपासून २५ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी चाहते टीमला पाठिंबा देण्यासाठी माेठ्या संख्येत जमले हाेते.

...टीमचे शर्ट
३५ ते ४० डॉलरमध्ये
एरिना टीम मॅर्चेडाइज दुकानावर चाहत्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेती. ३५ ते ४० डाॅलर िकमतीचे टी शर्ट घेण्यासाठी ही गर्दी हाेती.