आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिकसाठी केंद्राच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत ७५ खेळाडू निवडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - २०१६ मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढवण्याच्या हेतूने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत ७५ खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एनएसडीएफ) नुसार तयार करण्यात आलेल्या या योजनेचे उद्दिष्ट २०१६ आणि २०२० च्या ऑलिम्पिक खेळांत पदक जिंकण्याची क्षमता असलेले खेळाडू शोधणे आणि त्यांची मदत करणे हे आहे.

क्रीडा मंत्रालयानुसार या योजनेत अॅथलेटिक्स, तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती आणि नेमबाजीवर विशेष लक्ष दिले जाईल. निवडक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा असलेल्या केंद्रावर प्रशिक्षण देणे तसेच इतर आवश्यक मदत करणे व आर्थिक मदतही केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीचे सहामाही, वार्षिक मूल्यमापनही होईल. कामगिरीचे मूल्यमापन, योजनेचे सादरीकरण तसेच सविस्तर नियम ठरवण्यासाठी खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली "टीओपी स्कीम एलिट अॅथलिट्स आयडेंटीफिकेशन कमिटी' नावाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये राहुल द्रविड, पुलेला गोपीचंद, अभिनव िबंद्रा आणि मेरी कोम यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...