आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी: येत्या 1 जूनपासून रंगणार सामने; 2 वर्षांत 23 वनडे; 20 वेळा 300 प्लस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ३१८/७, ३१९/१, ३४१/९... हे तीन स्कोअर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशने केले आहेत. आता इकडेही लक्ष द्या. ४४४/३, ३०२/९, ३२८/६, ३३९/६ आणि ३३०/६.. हे इंग्लंडने आपल्या देशात मागच्या पाच वनडे सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना केलेले स्कोअर आहेत. इंग्लंडमध्ये क्रिकेटची चर्चा सुरू झाली तर स्विंग होणारे चंेडू लक्षात येतात. मात्र, हे वरचे स्कोअर पाहिले तर लक्षात येते की, इंग्लंडमध्ये गेल्या काही दिवसांत चेंडू स्विंग कमी होऊन फलंदाजांची बॅट अधिक तळपली आहे.  
 
हा बदल आपोआप झाला नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियात २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषकात आपल्या संघाच्या क्वार्टर फायनलमधील पराभवानंतर वनडे धोरणानुसार बरेच बदल केले. यानुसार देशातील खेळपट्ट्या फलंदाजांना मदतगार (वनडे आंतरराष्ट्रीय आणि लिस्ट अ सामन्यांसाठी) तयार करण्यात आल्या. यानंतर येथे मोठमोठे स्कोअर होऊ लागले अाहेत.  
 
२०१५ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये २३ वनडे आंतरराष्ट्रीय सामने झाले. यात एकूण  २० वेळा ३०० पेक्षा अधिकचा स्कोअर झाला. या कालावधीत जगात इतर कोणत्याही देशात १३ पेक्षा अधिक वेळा ३०० प्लसचा स्कोअर झाला नाही. या दोन वर्षांत इंग्लंडने २ वेळा ४०० पेक्षा अधिक धावा काढल्या. या काळात भारतात एकदा ४०० प्लस धावा झाल्या. जगात इतर कोणत्याही देशात १ मे २१०५ नंतर आतापर्यंत एकदाही ४०० प्लसचा स्कोअर झालेला नाही.  

भारत-न्यूझीलंड सराव सामना अाज; युवी मुकणार
विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली किताबावरचे अापले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया रविवारी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये अापला पहिला सराव सामना खेळणार अाहे. भारत व न्यूझीलंड संघ सराव सामन्यात समाेरासमाेर असतील. या सराव सामन्यादरम्यान सर्वांची नजर दाेन महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या फिरकीपटू अार.अश्विनवर असेल. युवराजसिंगमुळे सध्या भारतीय संघामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले अाहे. माध्यमांच्या सूत्रांनुसार ताे सध्या अाजारी अाहे.
बातम्या आणखी आहेत...