आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League Football: Ronaldo Make Hattric, Real Madrid In Semifinal

चॅम्पियन्स लीग फुटबॉल: रोनाल्डोची हॅट्ट्रिक; रिअल माद्रिद उपांत्य फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - क्रिस्टियानो रोनाल्डोने नोंदवलेल्या अप्रतिम हॅट्ट्रिकमुळे मंगळवारी रात्री रिअल माद्रिद क्लबने वोल्फ्सबर्गचा ३-० गोलने दणदणीत पाडाव करून विक्रमी सहाव्यांदा चॅम्पियन्स फुटबाॅल लीगच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

केवळ एका मिनिटाच्या आत रोनाल्डोने सलग दोन गोल नोंदवून प्रारंभिक १७ मिनिटांमध्येच माद्रिदला सामन्यावर पकड मजबूत करून दिली. त्यानंतर चॅम्पियन्स लीगचे १० वेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघाला आणखी १३ मिनिटे विजयी गोलची वाट बघावी लागली. रोनाल्डोने फ्री किकवर हा गोल केला. त्याची वेगवान किक गोलरक्षक दिएगो बेनाग्लिओच्या बाजूने गोलमध्ये जाऊन स्थिरावली.

क्रिस्टियानोच्या दणकेबाज खेळामुळेच आमच्यासाठी आजची रात्र जादुई ठरल्याची प्रतिक्रिया माद्रिदचा कर्णधार सेर्गिओ रामोसने विजयानंतर व्यक्त केली. विश्वातील अव्वल फुटबाॅलपटू असल्याचे रोनाल्डोने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गत काही दिवसांपासून तो फाॅर्म परत मिळवण्यासाठी झुंजत होता. या सामन्यातील खेळाद्वारे रोनाल्डो काय आहे, याची संपूर्ण फुटबाॅल जगताला जाणीव झाली असेल. तो खरेच सर्वांहून वेगळा आहे. कारण फारच मोजक्या लोकांना एकाच सामन्यात तीन गोल नोंदवता येतात, अशी स्तुतिसुमने फ्रेंचमनने उधळली.
रोनाल्डोने मिळवून दिलेल्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कारण याआधी पहिल्या चरणात स्पॅनिश गेंट्सकडून माद्रिदला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

रोनाल्डोची ३७ वी हॅट्ट्रिक
३१ वर्षीय रोनाल्डोने २५ यार्ड अंतरावरून हाणलेली जोरदार किक सरळ गोलमध्ये गेली अन् चॅम्पियन्स लीगमधील त्याची माद्रिदसाठी ३७ वी हॅट्ट्रिक पूर्ण झाली. तसेच हा त्याचा चॅम्पियन्स लीग मोसमातील १६ वा गोल होता. वैयक्तिक १७ गोल्सची बरोबरी करण्यासाठी क्रिस्टियानोला आणखी एका गोलची आवश्यकता आहे.

छायाचित्र: गोल केल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने असा जल्लोष केला.