लंडन- ऑस्ट्रेलियाने भारताला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ ने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत १४ व्यांदा विजेतेपद पटकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ३८ वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा फायनल प्रवेश केला होता. मात्र, भारताला विजेतेपद मिळाले नाही. भारताने पराभवानंतरही इतिहास रचला. या स्पर्धेत भारताने प्रथमच रौप्यपदक जिंकले आहे. याआधी भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी १९८२ मध्ये कांस्यपदकाच्या रूपाने झाली होती. एक दिवसाआधीच ऑस्ट्रेलियाने साखळी सामन्यात भारताला ४-२ ने हरवले होते.
फायनलचा सामना संघर्षमय ठरला. फायनलचा दबाव दोन्ही संघांवर स्पष्टपणे दिसत होता. आक्रमक हॉकी खेळणारी ऑस्ट्रेलियन टीम पूर्ण ६० मिनिटांत रक्षात्मक खेळ करत होती. परिणामी सामन्याचे चारही क्वार्टर गोलरहित बरोबरीत सुटले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्येच तीन पेनल्टी कॉर्नर मिळवून भारतीय गोटात खळबळ माजवली होती. मात्र, भारतीय भिंत ऊर्फ गोलकीपर श्रीजेशने जबरदस्त बचाव करून ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले. भारताने मैदानी खेळ चांगला केला. भारतानेही वारंवार आक्रमक करून गोल करण्याचे प्रयत्न केले.
सहा खेळाडूंना दाखवले कार्ड : यादरम्यानऑस्ट्रेलियाच्या खेळडूंना कार्ड दाखवण्यात आले, तर भारताच्या प्रदीपला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले.
जर्मनीला कांस्य जर्मनीनेइंग्लंडला १-० ने पराभूत करून स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. जर्मनीसाठी सामन्यात एकमेव गोल मार्को मिल्तकाऊने ४० व्या मिनिटात केला.
भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी
भारत या वर्षी पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला. याआधी भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी १९८२ मध्ये होती. त्या वेळी भारताने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भारत सात वेळा चौथ्या स्थानी राहिला. मात्र, यंदा भारतीय संघाने श्रीजेशच्या नेतृत्वाखाली यश मिळवले.
आतापर्यंतचे चॅम्पियन :
ऑस्ट्रेलिया : (१४वेळा) : १९८३, ९४, ८५, ८९, ९०, ९३, ९९, २००५, ०८, ०९, १०, ११,१२, १६.
जर्मनी: (१०वेळा) : १९८६, ८७, ८८, ९१, ९२, ९५, ९७,२००१, ०७, १४.
हॉलंड: (०८वेळा) : १९८१, ८२, ९६, ९८, २०००, ०२, ०३, ०६.
पाकिस्तान: (०३वेळा): १९७८, ८०, ९४.
स्पेन: (०१वेळा) २००४.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)